The need to take care of wildlife; Those who are responsible for their negligence: Barate
पुणे, दि. ७ (चेकमेट टाईम्स): वारजेच्या तीन
बाजूला वन विभागाच्या जागा असून, तेथे आमच्यासारख्या सामाजिक संस्थांनी काम सुरु
ठेवल्याने वन्यजीव संख्या वाढली आहे. मात्र त्या वन्य जीवांच्या जीवांचे रक्षण
करण्याचे काम असलेली मंडळी मात्र त्याकडे आवश्यकतेनुसार लक्ष्य देत नसून, त्यामुळे
वन्यजीवांचा जीव धोक्यात येत आहे. वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष्य द्यावे,
अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा वारजे वन उद्यान सेवा संस्थाचे संस्थापक महेश बराटे
यांनी दिलाय.
नुकताच एक पूर्ण वाढ झालेला एक
मोर चांदणी चौकाजवळ एनडीए रोड जवळ कुत्र्यांनी जखमी केलेल्या अवस्थेत दत्तात्रय
वांजळे यांना मिळून आला. त्यांनी महेश बराटे यांचे वन्यजीवांकरिता चालू असलेले काम
लक्षात घेता, बराटे यांना फोन करून माहिती दिली. यावेळी बराटे यांनी तत्काळ
घटनास्थळी धाव घेऊन, वनविभागाला कळवत, मोराला जीवदान दिले आहे.
मात्र यात बराटे यांनी
सायंकाळच्या वेळेस वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केल्यावर दोन तासानंतर
संध्याकाळी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी आले. तोपर्यंत त्या मोराचे
संरक्षण करत दत्तात्रय वांजळे, कौस्तुभ खटावकर, अमर अनारसे या तरुणांना थांबून
राहावे लागले. वनविभागाने त्या जखमी मोराला भूगाव येथील प्राण्यांच्या रुग्णालयात
दाखल करून, त्याला जीवदान दिले असले तरी, वारजेच्या आजूबाजूला नेहमीच वन्यजीव
रस्त्यावर, वस्तीत येतात. मात्र त्या जीवांना संरक्षण देण्याबाबत वन विभाग उदासीन
असल्याचे प्रकर्षाने समोर येते आहे. या भागात वने असूनही वन विभागाचा तत्काळ
उपलब्ध होणारा कायम सेवक, वस्ती पथक काहीही आढळून येत नसल्याने, महेश बराटे यांनी
नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर महेश बराटे
यांनी या भागात वन विभागाचा कायम कर्मचारी आणि गस्त सुरु करण्याची मागणी केली
असून, मागणी पूर्ण न केल्यास वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा बराटे
यांनी दिलाय.
माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम
आणि युट्युबवर फॉलो करा...!
फेसबुक
लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
युट्युब
लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/