Type Here to Get Search Results !

उद्याचे खासदार पुन्हा आढळरावच असतील, नाटकवाला नाही; शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याची मविआ मध्ये पुन्हा ठिणगी

 

पिंपरी, दि. ३० (चेकमेट टाईम्स): “मी पुन्हा येईन” अशी दर्पोक्ती करणाऱ्यांना मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आडवे केले. भविष्यातील ही अशी आव्हाने मुख्यमंत्री पेलणार आहेत. गल्ली बोळातील शिवसैनिक ही शिवसेनेची ताकत आहे. कोरोनामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. रिक्षावाले, फेरीवाले अशा सर्व सामान्य नागरीकांना मदत देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यांचा टिव्ही वरील संवाद सर्वांना आपला जिव्हाळ्याचा वाटतो असे प्रतिपादन शिवसेना उपनेते व विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांनी केले.

 शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांचे रौद्रावतारी भाषण; मुख्यमंत्री देखील पाहतच राहिले

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिक संतोष वाळके, शिवसेना दिघी शाखा आणि कै. तानाजी सोपानराव वाळके व कै. सुजाता एकनाथ वाळके प्रतिष्ठान यांच्या वतीने गुरुवारी (दि. 29 जुलै) महायज्ञ रक्तदान शिबीराचे आयोजन दिघी येथे करण्यात आले होते. यावेळी झालेल्या लकी ड्रॉ मधिल विजेत्यांना मिर्लेकर यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

 पुण्यात भाजपाच्या विरोधात शिवसेना मैदानात; विधानसभेच्या निवडणुका लढण्याचे संकेत

यावेळी संपर्क प्रमुख माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आयोजक संतोष वाळके, कामगार नेते इरफान सय्यद, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, भोसरी विधानसभा उपशहर प्रमुख ॲड. कुणाल तापकीर, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा संघटक आबा लांडगे, भोसरी विधानसभा संघटक तुषार सहाणे, भोसरी विधानसभा संघटक सचिन सानप, खेड विधानसभा सहसंपर्क प्रमुख अशोक खांडेभराड, शिवसैनिक कृष्णा वाळके, ज्ञानेश्वर आण्णा वाळके, भाऊसाहेब काटे, अविनाश लोणारे, कैलास कुदळे, मनोज परांडे, प्रियशील पोटभरे, कैलास तापकीर, सागर रहाणे, गौरव आसरे, ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर वाळके तसेच सामाजिक कार्यकर्ते नवनाथ परांडे, सचिन महाजन, प्रभाकर कदम, गौरव आसरे, प्रशांत निबांळकर, संदिप वाळके, दिवेश सकपाळ, बापू परांडे, सुमित येडगे, नितीन परांडे, सुरज वाळके, एकनाथ वाळके, प्रशांत कुराडे, राहुल ववले, निलेश वाळके, हनुमंत खराबे, प्रदिप तुपे आदी उपस्थित होते.

 पुणे तिथे कॉंग्रेस उणे, नीलम गोऱ्हेंची कोपरखळी; कॉंग्रेस देशभर, शिवसेना कुठ? रमेश बागवे यांचा सवाल

यावेळी पुढे बोलताना मिर्लेकर म्हणाले की, हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना सामाजिक बांधिलकीतून केली. ते नेहमी सांगायचे आपण सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन काम केले पाहिजे. या कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संतोष वाळके यांनी रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन केले. त्याला मिळालेला प्रतिसाद आश्चर्यजनक व इतरांना प्रेरणादायी आहे. यातून जिव्हाळ्याचं नातं निर्माण होणार आहे. सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून येणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात कोण तरी नाटकवाला उभा राहतो आणि निवडून येतो. आढळरावांचा हा पराभर उध्दव ठाकरे यांनाही जिव्हारी लागला आहे. उद्याचे शिरुरचे खासदार आढळरावच असतील. यासाठी भोसरी विधानसभेतून त्यांना आघाडी मिळाली पाहिजे. यासाठी मी स्व:ता लक्ष घालणार आहे असेही शिवसेना उपनेते व विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर म्हणाले.

 मनसे व्यासपीठावरून भाजपा शिवसेना महायुतीच्या जाहिरातींची खिल्ली; आघाडीच्या जाहिरातींची देखील चर्चा

मिर्लेकर यांच्या या वाक्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह आला खरा, मात्र सध्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी सत्तेत आहे. त्यामुळे मिर्लेकर यांनी घेतलेला हा समाचार आघाडीत बिघाडी असल्याचेच स्पष्ट संकेत देतोय. असे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार आणि कॉंग्रेस नेते कोणत्याही परिस्थितीत आणि कोणाच्याही कसल्याही टीका टिप्पणीमुळे सरकार धोक्यात येऊ द्यायचे नाही, यावर ठाम असल्याचे दिसते. मात्र हे सद्याचे चित्र असले तरी आगामी लोकसभा असतील किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने लढण्याची पूर्ण तयारी करत असल्याचे चित्र आहे.

 शिवसेना प्रमुखांचा जन्म झालेल्या मतदार संघात शिवसैनिकाने फडकावले बंडाचे निशाण

भोसरी मतदार संघात शिवसेनेचा एकही नगरसेवक नसल्याची सल

2004 ला मी जेंव्हा प्रथम खासदार म्हणून निवडून आलो, त्या दिवशी सर्वात प्रथम माझा सत्कार दिघीमध्ये झाला. परंतू आता दुर्दैवाने भोसरी मतदार संघात शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही, याची सल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. तरी देखिल येथिल शिवसैनिक झपाटून कामाला लागले आहते. कायम सामाजिक उपक्रमांचे उत्तम आयोजन करणाऱ्या संतोष वाळके याने तर दिघी भागात घरोघरी शिवसेनेचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्यांना जनता विसरणार नाही. अशा शिवसैनिकांच्या मागे पक्ष निश्चित उभा राहिल असेही आढळराव पाटील म्हणाले.

 शिवसेनेच्या रमेश कोंडेंची राष्ट्रवादीच्या पीचवर जोरदार बॅटींग

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा वाळके, स्वागत संतोष वाळके, सुत्रसंचालन अक्षय मोरे आणि आभार सागर रहाणे यांनी मानले.

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.