पुणे, दि. १३ (चेकमेट टाईम्स): ‘आम्ही विश्व लेखिका',पुणे विभागाचे "आषाढस्य प्रथम दिवसे" हे ऑनलाईन कविसंमेलन
नुकतेच संपन्न झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी 'आम्ही विश्व
लेखिका' च्या अध्यक्ष, कवयत्री पद्मा
हुशिंग होत्या. संमेलनात महाकवी कालिदासाच्या साहित्यामधील वैशिष्ट्ये त्यांनी
उलगडून दाखवली आणि “आले भरून आभाळ, दाटे काळे काळे मेघ,
घनभरल्या आभाळी, सौदामिनीची ती रेघ... ही स्वरचित कविता देखील सादर केली.
'आम्ही विश्व लेखिका',
पुणे विभागाच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे यांनी महाकवी
कालिदासांनी मेघदूतामध्ये भूभागांचे, निसर्गाचे केलेलं वर्णन
आणि सद्य काळातही त्यामध्ये असलेले साम्य याचा उल्लेख
केला. आणि कालिदासांच्या साहित्य संपदेबद्दल भाष्य
केलं. आणि त्यानंतर त्यांनी पावसाळी हवा, हवेत गारवा, गारव्यात उब, उबेत आवेग, गाडीचा
वेग, सुखाचा पेग, सोबतीला ओ पी चे सूर, मांगके साथ तुम्हारा.... गाडीतही टांग्याचा फील ! ही आपली स्वरचित कविता सादर केली
'आम्ही विश्व लेखिका',
पुणे विभागाच्या उपाध्यक्षा मीना शिंदे यांनी सूत्रसंचालन केलं आणि तुझे नि माझे नाते, गाते पाऊस गाणे, रिमझिमत्या
सरींचे, हे तर नवे तराणे... अशी सुंदर गेय कविता सादर केली. या संमेलनामध्ये २० कवयित्रींनी भाग घेऊन आपल्या सुंदर कवितांनी आषाढातला
पहिला दिवस संस्मरणीय झाला.
मोगऱ्यांचे होकार आले, अन तो
आनंदाने नाचला, मनभर मग शुभ्र शुभ्र, पाऊस हासताना मी पाहिला अशा शिल्पा जोशी
जगनाडे यांच्यासह, पावसाळी रेघ काळी ही डॉ रजनी
अपसिंगेकर यांची कविता, मुजोर पाऊस ही सवी यांची कविता, तर रिमझिम पावसात होड्या
चालल्या चालल्या या अर्चना मायदेव, वर्षाऋतू या माधुरी बेंद्रे-लोणकर,पावसाची
मैफल या सुनिता कुलकर्णी, पाऊस या दीपाली थेटे-राव यांच्या लष्करातील
जवानाच्या पत्नीचा विरह मांडणाऱ्या कवितेसह, शाही मृग या मिनाक्षी नवले, तुझ्या
माझ्यातला तो पाऊस ही शिल्पा केतकर यांची कविता, निसर्गराजा आणि श्रावण या नंदिनी
प्रभाकर चांदवले यांच्या कवितांनी हे कवी संमेलन ऑनलाईन नव्हे तर व्यासपीठावर हवे
होते, असे वाटून गेले.
या ऑनलाईन कविसंमेलनात सुरेख
आषाढ सरींची बरसात झाली आणि 'आषाढस्य प्रथम दिवसे' हा महाकवी कालिदास दिन साजरा केला. आम्ही विश्व
लेखिका समूहाच्या सदस्या उत्साहाने संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी
मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 'आम्ही विश्व लेखिका',पुणे विभागाच्या संचालक कल्पना कुलकर्णी, उपसचिव
साधना कुलकर्णी, निमंत्रक संध्या वाघ अशा पदाधिकारी उपस्थित
होत्या, सचिव माधुरी गयावळ यांनी आभारप्रदर्शन केले.
माहिती महत्वाची वाटत असेल तर
शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर
फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक
पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची
लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/