राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी प्रसिद्धी साठीचे पोरखेळ बंद करावेत; जगदीश मुळीक यांचा पलटवार
पुणे, दि. ११ (चेकमेट टाईम्स): समाविष्ठ
गावांच्या विकास निधीवरून आता राष्ट्रवादी आणि भाजपा आमने सामनेआली आहे. काल भाजपा
प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी समाविष्ठ २३ गावांच्या
विकासासाठी ९ हजार कोटींची तरतूद केल्याची मागणी केली. त्याच्या प्रतिउत्तरादाखल
राष्ट्रवादीच्या पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री असताना, समाविष्ठ करण्यात आलेल्या ११ गावांसाठी किती निधी दिला होता?
असा प्रतिप्रश्न करत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला होता. आता प्रशांत जगताप
यांना भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
२३ गावांच्या विकासासाठी ९ हजार कोटीचा निधी द्या; चंद्रकांत पाटील यांची मागणी
जगदीश मुळीक यांनी म्हटले आहे
की, एकच गोष्ट वारंवार सांगितली की खरी वाटायला लागते, याच भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे शहराध्यक्ष धादांत खोट बोलत असतात. पण पुणेकर सुज्ञ आहेत. राष्ट्रवादीच्या
नाकर्तेपणाला ते चांगलेच ओळखून आहेत, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार
चंद्रकांत पाटील यांनी काय काम केले? हे विचारणाऱ्यांनी कधीतरी चंद्रकांतदादांच्या
कोथरूड मतदारसंघात यावे आणि दादांनी केलेल्या अफाट सेवाकार्याचा अभ्यास करावा. अर्थात
यांच्या पक्षाचं अस्तित्वही जिथे नाही तिथे कोणी काय काम केलं हे त्यांना कसं
समजणार ? असा सवाल जगदीश मुळीक यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष
फक्त माध्यमात सापडतात, कामाच्या नावाने शून्य !?
पुणे मनपा ताब्यात घेण्याची
वलग्ना करणाऱ्यांनी आधी सर्व जागांसाठी उमेदवार शोधावेत आणि मग भाजपच्या
प्रदेशाध्यक्षांवर टीका करावी. राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांनी प्रसिद्धी
मिळवण्याचे पोरखेळ बंद करून स्वतःच्या पक्षातील अस्तित्वाकडे अधिक लक्ष द्यावे असा
सल्ला भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक व संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिला आहे.
समाविष्ट गावांना फडणवीस सरकारने किती हजार कोटी दिले होते ?: प्रशांत जगताप यांचा सवाल
माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम
आणि युट्युबवर फॉलो करा...!
फेसबुक
लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
युट्युब
लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/