Road in Rajyog Society |
Repair arbitrarily
damaged road in Rajyog Society; Demand of Vasudev Bhosale
पुणे, दि. 2
(चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील राजयोग सोसायटी (Rajyog Society) परिसरातील एक
चांगला रस्ता मनमानी पद्धतीने काम करून खराब करण्यात आल्याचा आरोप करत, हा रस्ता
तातडीने दुरुस्त करण्यात यावा. त्याचबरोबर तो खराब करणाऱ्यांवर कारवाई करण्यात
यावी अशी मागणी भाजपा ओबीसी आघाडीचे पुणे शहर सरचिटणीस वासुदेव भोसले (BJP OBC Cell Vasudeo Bhosale) यांनी केली
आहे.
राजयोग
सोसायटी परिसरातील राजयोग दत्त मंदिर (Rajyog Datta Mandir) ते सकपाळ कॉलनी (Sakpal Colony) या टप्प्यात काही
दिवसांपूर्वी पावसाळी वाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र त्या टाकण्यात आल्यानंतर
संबंधित ठेकेदाराने सदरील रस्ता नियमाप्रमाणे पूर्ववत न करता वरवर कॉंक्रीट टाकून
अर्धवट अवस्थेत सोडून दिला आहे. त्यामुळे या भागात रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ
नागरिक, महिलांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून, पुणे महानगरपालिका (Pune Corporation) प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
त्याचबरोबर
ज्या पावसाळी पाण्यासाठी या वाहिन्या टाकण्यात आल्या, त्याचा काहीही उपयोग झालेला
नसून, सद्यस्थितीला रस्त्यावर पाणी साठत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे सदोष
पद्धतीने पावसाळी वाहिन्या टाकणाऱ्यांसह असे काम नजरेआड करणाऱ्यांवर कारवाई
करण्यात यावी. त्याचबरोबर या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणीही
वासुदेव भोसले यांनी केली आहे.
याबाबत
आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
फेसबुक
लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
युट्युब
लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/