पुणे, दि. १९ (चेकमेट टाईम्स): खडकवासला विधानसभा मतदार संघातील एका २५ वर्षे रखडलेल्या वाटेला नगरसेवकांचे प्रयत्न आणि नेत्यांची साथ मिळाल्याने मोकळी वाट भेटली. त्या रस्त्यासाठीच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन आज झाले. पुढच्या दोन महिन्यात संरक्षण भिंतीसह २४ मीटर रुंदीच्या या रस्त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्याचा मानस देखील या नगरसेवकाने केला आहे. मात्र त्याच खडकवासला विधानसभा मतदार संघातील असाच एक बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित रस्त्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार आणि तिथे लक्ष दिलेले नेते इथे कधी लक्ष देणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
खडकवासला विधानसभा मतदार संघात जिथे नाही जात लोकल अधिकारी तिथे गेले जिल्हाधिकारी
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला खडकवासला विधानसभा मतदार संघातील कात्रज डेअरी
प्रस्तावित डीपी रस्त्याच्या सरंक्षण भिंतीचा प्रश्न पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक
युवराज बेलदरे यांच्या प्रयत्नातून मार्गी लावण्यात आला. आज सोमवार दिनांक १९ जुलै
२०२१ या कात्रज डेअरी प्रस्तावित डीपी रस्त्याच्या सरंक्षण भिंतीचे भूमीपूजन
नगरसेवक युवराज बेलदरे व कात्रज डेअरीचे अध्यक्ष विष्णू हिंणगे, एम.डी.
क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी
नानासाहेब बेलदरे, माजी नगरसेवक संतोष परांदे, कात्रज डेअरीचे इतर पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
याबाबत
बोलताना युवराज बेलदरे म्हणाले, अंदाजे २५० मीटर लांबीची सुरक्षा भिंत आणि रस्त्यासाठी
२ कोटी ५६ लाखांचा निधी पालकमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे
यांच्यामुळे आपल्याला मिळाला. बजेट बरोबरच ज्या तांत्रिक बाबींमुळे हा रस्ता अडला
होता, त्यात अजितदादांनी लक्ष दिल्याने हे काम शक्य होत असल्याचे बेलदरे यांनी
म्हटले आहे. येत्या तीन ते चार महिन्यात काम पूर्ण करून दादांच्या हस्ते लोकार्पण
करू असा विश्वास बेलदरे यांनी व्यक्त केला.
मात्र
त्याचवेळी याच खडकवासला विधानसभा मतदार संघातील असाच एक बहुप्रतीक्षित आणि
बहुचर्चित रस्ता, राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांच्या हद्दीतील असूनही त्याचा प्रश्न
मार्गी लागत नसल्याने चर्चेचा विषय झालाय. या रस्त्याचा प्रश्न या मतदार संघाच्या
खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत देखील पोचलाय, नव्हे तर सुप्रिया
सुळे यांनी त्या रस्त्याला प्रत्यक्ष भेट देखील दिली आहे. मात्र त्याला वर्ष उलटून
गेले तरीही त्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
याचे परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पडल्यास आश्चर्य
वाटायला नको.
माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/