Type Here to Get Search Results !

पुण्यातील स्मार्ट बसथांब्याचा स्मार्ट फलकाला नेमकं काय सांगायचंय? काकूंना पडला गहन प्रश्न

 



पुणे, दि. १४ (चेकमेट टाईम्स): पुणे शहर स्मार्ट शहरांच्या यादीत गेल्यानंतर डिसेंबर २०१८ ला शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा एक भाग म्हणून, शहरात विविध भागांत १०० ठिकाणी स्टेनलेस स्टीलचे नवे बसथांबे उभारण्यात संकल्प करण्यात आला होता. मोडकळीस आलेल्या बसथांब्यांच्या जागेवर नवे थांबे उभारण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी चांगले बसथांबे होते, त्याच्या शेजारीच हे बसथांबे लावण्यात आले होते. त्यानंतर मात्र आता त्याची दुरवस्था झाली असून, नागरिकांच्या करातून गोळा झालेले लाखो रुपये अशाप्रकारे भंगारात जात असतील तर लोकांनी कर भरणे थांबवले पाहिजे असे मत राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद उर्फ बंडू तांबे यांनी व्यक्त केले आहे.

 कर्वेनगर मध्ये पुणे मनपा बांधकाम विभागाची कारवाई; चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार

प्रवाशांना उन्हाळा, पावसाळ्यात सुरक्षिपतणे उभे राहता येईल, यासाठी स्मार्टबसथांबे उभारण्याचे पीएमपी प्रशासनाने ठरविले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एका बसशेडसाठी सुमारे तीन लाख रुपये आणि डिजिटल फलकासाठी वेगळा खर्च करण्यात आला. त्यासाठी जवळपास तीन कोटी रुपये पीएमपीएमएल’ला उपलब्ध करून दिले होते. त्या तीन कोटी रुपयांच्या बसथांब्यापैकी आता किती बसथांबे लोकांच्या प्रत्यक्ष सेवेत आहेत? असाही सवाल तांबे यांनी केला आहे.

 खुंटलेला वारजे कर्वेनगरचा विकास साधण्यासाठी नागरिकांनी कैलास दांगट यांना संधी द्यावी: वसंत मोरे

कर्वेनगर मधील वनदेवी मंदिर अर्थात वडाचा स्टॉप बसथांब्यावर अशाच पद्धतीने डिजिटल फलक असलेला एक स्मार्ट बसथांबा लावला होता. मागून विजेचा प्रकाश असलेल्या त्या फलकावर नागरिकांना बस सुविधांची माहिती मिळणे, बसच्या वेळा समजणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता त्यावर काही राजकीय मंडळींचे सरकते फोटो लावण्यात आले होते. बसथांबा लावल्यानंतर काही महिन्यातच तो फलक कोसळून खाली पडला आहे. त्याकडे त्या फलकावरील कोणत्याही राजकीय व्यक्तीसह पालिका आणि पीएमपीएमएलच्या कोणत्याही अधिकाऱ्याला पाहावेसे वाटले नाही याचे दु:ख आहे.

 कर्वेनगर मध्ये सामोसे कारखान्यात सिलेंडरचा भडका उडून ४ जण जखमी; दोघांची प्रकृती चिंताजनक

भविष्यात स्टेनलेस स्टीलचा, विद्युत उपकरणे असलेला हा डिजिटल फलक कोरोनामुळे अडचणीत आलेल्या रस्त्यावरील कोणी वाटसरुने भंगारात विकला तर आश्चर्य वाटायला नको. पण पुणेकरांचे कररूपी पैसे जर अशाचप्रकारे मनमानी उधळले जाणार असतील. तर पुणेकरांनी कर कशाला भरायला पाहिजे असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद उर्फ बंडू तांबे यांनी म्हटले आहे.

 आठ आठ वर्षे रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणाच सुरु नसणे हा तर नागरिकांच्या जीवाशी खेळ

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.