In Pune, a special facility has been
set up at this place for vaccination of actors and actresses
विरोधी पक्षनेत्या दिपाली
प्रदीप धुमाळ यांच्या प्रयत्नांना यश
पुणे, दि. ७ (चेकमेट टाईम्स): मानवी जीवनात प्रत्येक
गोष्टीला एक मूल्य आहे. त्यात मनोरंजन एक अविभाज्य घटक आहे असे म्हटल्यास वावगे
ठरणार नाही. दूरचित्रवाणी असेल की मोबाईल येण्यापूर्वी देखील मानवी जीवनात
निरनिराळ्या कलाकारांच्या माध्यमातून मनोरंजन केले जायचे आणि त्यामुळे माणूस
रिफ्रेश व्हायचा. त्यामुळे सर्व प्रकारच्या कलाकारांना तेव्हा एक मनाचे स्थान
होते. आता मात्र कलाकाराला फक्त कला सादर करणारा एक व्यक्ती म्हणून पाहिले जाते.
त्याच्या गरजा, त्याच्या अपेक्षा याकडे पाहण्यासाठी कोणालाही वेळ नाही. त्यात
आलेल्या या कोरोना महामारीत तर कलाकार पार खचला.
मात्र त्यांना उभारी देण्याचे
काम केले आहे, पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी.
दिपाली धुमाळ यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार करत, कलाकारांना
कोरोना प्रतिबंधक लस मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करत, आठवड्यातले दोन दिवस एका
रुग्णालयात कलाकारांसाठी राखीव करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे शहरातील सर्व
कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, कलाकारांना लस घेणे सोयीस्कर होणार आहे.
पुणे शहर सांस्कृतिक माहेरघर
आहे. या पुणे शहरातील कलेच्या विविध घटकातील कलाकार आज कोरोनाच्या महामारीमुळे
हतबल झाले आहेत. नाटयगृह व सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलेवरती पोट असणाऱ्या
कलाकारांना उपासमारीची वेळ आली आहे. या धर्तीवर कलाकारांचे महानगरपालिकेच्या
माध्यमातुन कोविड लसीकरण झाल्यास त्यांना कार्यक्रम करणे सोयिस्कर होईल व त्या
अनुषंगाने नाट्यगृह लवकरात लवकर खुली होतील व त्यांना बाहेरच्या कार्यक्रमास
बोलवले जाईल. त्यांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल व त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या
प्रमाणात दिलासा मिळेल, या जाणीवेतून दिपाली धुमाळ यांनी पालिकेकडे कलाकारांचे
पुण्यातील श्रध्दास्थान असलेल्या बालगंधर्व रंगमंदीरात लसीकरणाची सोय करण्याची
मागणी केली होती.
त्यासाठी विजय पटवर्धन फाऊंडेशन
व राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने अभिनेते विजय
पटवर्धन, राष्ट्रवादी
सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी
नगरसेवक प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, अभिनेते राजू बावडेकर,
योगेश सुपेकर, प्रसाद कुलकर्णी, गणेश गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त रुबल
अग्रवाल यांना प्रत्यक्ष भेटून मागणीचे निवेदन दिले होते. त्याला प्रतिसाद देत,
रुबल अग्रवाल यांनी, पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात आठवड्यातील दोन
दिवस कलाकारांसाठी राखीव ठेवण्यास अनुकुलता दर्शवली आहे. त्याचबरोबर कलाकारांच्या
आर्थिक समस्या पाहता, त्यांना मोफत लसीकरण करण्यात येईल अशी माहिती विरोधीपक्ष
नेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांची दिली.
माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम
आणि युट्युबवर फॉलो करा...!
फेसबुक
लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
युट्युब
लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/