पुणे, दि. १३ (चेकमेट
टाईम्स): गणपती माथा ते शिंदे पूल हा रस्ता दुतर्फा वाहतूक असल्याने आणि रस्त्यात दुभाजक
नसल्याने अपघात नित्याचे झाले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी
होण्यापूर्वी पुणे महानगरपालिकेने वाहतूक विभागाशी समन्वय साधत या मार्गावर किमान
गतिरोधक बसवून द्यावेत अशी मागणी अर्चना आणि पराग ढेणे यांनी केली आहे.
अनेक
वाहनचालक दुसऱ्या वाहनाला ओलांडण्यासाठी दुसऱ्या मार्गिकेत जातात. अशावेळी समोरून
येणाऱ्या वाहनाच्या वेगाचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी
एक स्पर्धा परीक्षेचा सराव करणाऱ्या मुलीचा देखील याच रस्त्यावर गंभीर अपघात झाला.
या पार्श्वभूमीवर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त उमाकांत
डिग्गीकर यांच्याकडे ढेणे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. त्याचबरोबर गणेशपुरी
भागात देखील एक गतिरोधक बसवण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/