पुणे, दि. १६
(चेकमेट टाईम्स): वाढदिवसाच्यानिमित्ताने प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावले
तर पर्यावरण संतुलित राहण्यासाठी नक्कीच मदत होईल. झाड लावून त्याचे संवर्धन करणे
ही प्रत्येकाची नैसर्गिक आणि नैतिक
जबाबदारी आहे, असे मत कवी राजेंद्र वाघ यांनी पुणे
महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आणि गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या
अध्यक्षा डॉ. भारतीताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्यावतीने वारजे
टेकडीवर आयोजित वृक्षारोपणप्रसंगी मांडले.
याप्रसंगी
गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे संजय गोळे, संपत खैरे, बाळकृष्ण नेहरकर, राकेश सावंत, दिलीप नारखेडे, भगवान चव्हाण,
जयसिंग लावंड, निवास माळी, विनायक
देशमुख, विश्वास फडतरे, दिलीप डोंगरे, शिवाजी घोरपडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वृक्षारोपण व संवर्धन
याकरिता उपस्थितांनी तयारी दर्शविली असून इतर अनावश्यक गोष्टी टाळून वाढदिवस साजरा
करताना दरवर्षी किमान एक स्वदेशी झाड
लावण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी
बोलताना खेळांचा बादशाह, होम मिनिस्टर फेम बाळकृष्ण नेहरकर म्हणाले, आज सर्वाना
प्राणवायू गरजेचा झाला आहे याची जाणीव झाली आहे. मात्र अनेकांना वृक्षारोपण करता
येत नाही. ते घराशेजारी कुंड्यांमध्ये झाडे लावून निसर्गप्रेम जपतात. मात्र अशांनी
किमान एक काम नक्की करावे, “ते म्हणजे बिया साठवण्याचे”. तुम्ही घरात आणलेल्या
सर्वप्रकारच्या फळांच्या बिया साठवून आमच्याकडे दिल्यास, त्याची आम्ही ब्राईट
फ्युचर क्लबच्या माध्यमातून डोंगर रांगांमध्ये पेरणी करू. आपण दिलेल्या १००
बियांपैकी १० झाडे नैसर्गिकरीत्या आली तरी त्याचे फलित सर्व जगाला मिळू शकेल.
तेव्हा “आभाळ फाटलंय, एक टाका माझा” या उक्तीप्रमाणे आंबा असो की जांभूळ, सीताफळ
असो की पेरू, पपई असो की कडू लिंब, कोणत्याही बिया कचऱ्यात फेकू नका. त्या वाळवा
आणि साठवून आम्हाला द्या, असे आवाहन नेहरकर यांनी केले आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत
आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/