पुणे, दि. १
(चेकमेट टाईम्स): भक्तिमय विचारधारणेतून संघटित "श्री देवदर्शन यात्रा समिती,
पुणे" च्या वतीने पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या तुकाईवाडी
(ता. खेड, जि. पुणे) येथील पांडवकालीन "तीर्थक्षेत्र
श्री तुकाईमाता देवस्थान" प्रवेशक्षेत्राचे सुशोभीकरण करण्यात आले.
सदरील उपक्रम
हा श्री तुकाईमातेच्या मनोभावे पुजनानंतर आदर्श शिक्षक महादेव नेहेरे यांच्या हस्ते
देवस्थानाच्या प्रवेशक्षेत्र परिसरात ५१ वृक्षरोपांची लागवड करून स्वागतफलकाच्या
अनावरणाने संपन्न केला गेला. माहिती तंत्रज्ञान तसेच सेवा क्षेत्रात कार्यरत
असलेले पुण्यातील काही तरुण संघटितपणे अध्यात्मिक वसा जपत गेली ६ वर्षे समीतीच्या
माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्यास नेहमीच प्रयत्नशिल असतात. त्याचाच एक भाग
म्हणून सेवाभावी संकल्पनेतून श्री तुकाईमाता देवस्थान प्रवेशक्षेत्राचे भक्तिभावे
सुशोभीकरण करण्यात आले.
"माणूस
किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला अविरत महत्व आहे" हे प्रामुख्याने नमूद
करत प्राप्त संस्कारांची शिकवण आपल्या कृतींतून दर्शवत समितीचे सदस्य खूप मोलाचं
कार्य करत आहेत अशी प्रोत्साहनपर प्रतिक्रिया या वेळी नेहेरे गुरुजींनी आवर्जून
नोंदविली. समितीच्या कार्यास उत्तरोत्तर प्रगती लाभो असाही गुरुजींनी आशिर्वाद
दिला.
या प्रसंगी
तुकाईवाडीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य प्रवीण कोरडे, वरची
भांबुरवाडीचे सरपंच विजय थिगळे, ग्रा.पं. सदस्य किशोर रोडे,
शुभम ढोरे, प्रवीण भांबुरे, सोपान कोरडे आणि दिनेश कोरडे उपस्थित होते. समितीने आजवर केलेल्या
कार्याचा आढावा घेऊन सर्व उपस्थितांनी कौतुक केले आणि भविष्यातील वाटचाली करीता
शुभेच्छाही दिल्या. समितीच्या वतीने विजय भांबुरे यांनी या कार्याचा सुनियोजित
पुढाकार घेऊन सर्व उपस्थितांचे आभार मानले.
याबाबत
आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
फेसबुक
लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
युट्युब
लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/