Type Here to Get Search Results !

शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या “आय लव्ह वारजे” सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड

 

Vandalism of "I Love Warje" selfie point which inaugurated by Sharad Pawar

 

पुणे, दि. ६ (चेकमेट टाईम्स): अगोदर आय लव्ह नऱ्हे (I Love Narhe), त्यानंतर आपलं खडकवासला (Aapla Khadakwasla) या सेल्फी पॉईंटची तोडफोड झाल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhashchandra Bose) आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या वारजे मधील आय लव्ह वारजे या सेल्फी पॉईंटची देखील अज्ञातांनी तोडफोड केल्याचे समोर आले आहे. (Vandalism of "I Love Warje" selfie point which inaugurated by Sharad Pawar) यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधितांवर कठोर कारवाई केली जायला हवी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

 

आरएमडी कॉलेज (RMD College) समोर हा सुंदर सेल्फी पॉईंट असून, दररोज सकाळी या भागात चालायला येणाऱ्यांची मोठी संख्या असते. वारजे मधील हा रस्ता पूर्ण पुणे शहरातील एक सुंदर सुशोभित रस्त्यांपैकी एक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अर्धा ते एक किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावरून प्रवास केल्यावर थकवा देखील नाहीसा होतो. त्याचबरोबर वारजे मध्ये कोणाकडेही पाहुणे मंडळी आली तर, या सेल्फी पॉईंटवर आवर्जून सेल्फी काढायला येतात. अशा या सेल्फी पॉईंटची तोडफोड झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

ही केवळ सेल्फी पॉईंटची तोडफोड नाही

वारजे मधील वरकरणी ही सेल्फी पॉईंटची तोडफोड वाटत असली तरी, गेल्या काही महिन्यांपासून या भागातील फ्लेक्स बॅनर फाटण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आपल्या घरावर, टेरेसवर, झोपड्यांवर टाकण्यासाठी फ्लेक्स लागत असल्याने ते फाडून नेत असतीलही. मात्र हे एवढ्यावर थांबत नाही. गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये वारजे माळवाडी परिसरात फ्लेक्स विद्रुपीकरण, फ्लेक्स फाडणे, ठरावीक चेहरा फाडणे / विद्रूप करणे असे प्रकार घडलेले आहेत. ते अजूनही कधी मधी घडत आहेत.

 

मात्र सार्वजनिक ठिकाणी असलेल्या आणि अगोदरच पालिकेच्या कोणत्याही परवानगीशिवाय लावलेले अनधिकृत फ्लेक्स फाटले / फाडले गेल्याने यावर अपवाद वगळता फार काही प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. मात्र आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याअगोदर पुणे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर शहराच्या बकालपणात वाढ करणाऱ्या आणि पालिकेचा महसूल बुडवणाऱ्या व्यावसायिक फ्लेक्सकडे पालिकेचा आकाशचिन्ह विभाग कानाडोळा का करत आहे. त्यात त्यांचे काही वैयक्तिक हित दडले आहे का? असाही प्रश्न नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.

 

 

याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

फेसबुक लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

युट्युब लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.