Type Here to Get Search Results !

विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्य नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व राज्य कार्यकारिणी पदग्रहण सोहळा संपन्न

 

पुणे, दि. ६ (चेकमेट टाईम्स): विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस 05 जुलै 2015 या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संघटनेचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व राज्य कार्यकारीणी सदस्य यांचा पदग्रहण सोहळा मान्यवर तसेच  महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

लोकशाही पद्धतीने निवड प्रक्रिया ऑनलाईन मिटींगद्वारे होऊन सर्व सहमतीने प्रदेशाध्यक्षपदी दिलीप भिकोबा दिक्षीत (पुणे)  यांची निवड झाली. संजय बोराडे (औरंगाबाद) यांची सरचिटणीसपदी तर संजय सुतार (नांदणी, कोल्हापूर) यांची राज्य सचिवपदी निवड करण्यात आली. तर अविनाश गव्हाणकर (वाशिम), सचिन सुतार (इचलकरंजी), अरूण भालेकर (औरंगाबाद), आनंद मिस्त्री (सिंधुदुर्ग), संजय दिक्षीत (जळगाव) यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली.

 


वसंत सुतार (मुंबई)  यांची राज्य संघटक महामंत्री पदी निवड झाली. नरेश सुतार  (ठाणे) यांची मुंबई विभाग अध्यक्षपदी निवड झाली. जितेश मेश्राम- नागपूर विभाग अध्यक्ष, गणेश लाठेकर -अमरावती विभाग अध्यक्ष तर अॅड. अरूण भटारकर (चंद्रपुर) यांची  नागपुर विभाग संघटकपदी निवड करण्यात आली.  या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व राज्य कार्यकारिणी सदस्यांना नियुक्ती पत्र कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे मा.सभापती पाडुरंग आप्पा खेसेमा. जिल्हा परिषद सदस्य अर्जुन गरूड  मा. उपसरपंच लोहगाव नवनाथ मोजे व संस्थापक अध्यक्ष प्रा.नागोराव पांचाळ यांच्या हस्ते देण्यात आले. पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

शिल्पा यादव यांची खडकवासला विभाग राष्ट्रवादी पक्ष उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वर्धापनदिनाचे औचित्य साधून सर्वांना गुलाब पुष्प, पेढे, मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच समाजामध्ये सकारात्मक वृद्धी व्हावी या उद्देशाने मोगरा व गुलाब यांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. मान्यवरांनी सामाजिक मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित सरचिटणीस संजय बोराडे यांनी आभार मानले.  राज्य सचिव संजय सुतार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

 


महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून प्रतिनिधी/पदाधिकारी तसेच महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. दुपारी स्नेह भोजनानंतर संघटनेची पुढील दिशा, वाटचाल याविषयी प्रत्येकाने आपल्या सुचना व मुद्दे मांडले.  तदनंतर नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष दिलीप दिक्षीत यांनी धर्मादाय आयुक्त निर्देशानुसार कार्यप्रणाली संघटन चालवले जाईल. सर्व पदाधिकारी  सर्वसहमतीने निर्णय घेऊन संघटन वृद्धी व  सामाजिक हितसंवर्धनासाठी सतत प्रयत्नशील राहतील असा सकारात्मक विश्वास  देऊन सर्वांना आश्वाशीत केले.

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

फेसबुक लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

युट्युब लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.