पुणे, दि. २०
(चेकमेट टाईम्स): विधानसभेच्या निवडणुकांना आणखीन तीन वर्षे आहेत. मात्र येऊ
घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढेल अशी
घोषणाच कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
नाना
पटोले यांनी आज दिल्लीत पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. स्वबळाला राहुल
गांधींनी मंजुरी दिली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये
काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती खुद्द पटोले यांनी
प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. राहुल गांधींशी झालेल्या भेटीत पटोले यांनी
राज्यात काँग्रेसला काम करण्याची मोठी संधी आहे, असे सांगितले.
पटोलेंनी राज्यातील काँग्रेसच्या आगामी भूमिकेबाबत राहुल गांधी यांच्याशी सर्व
चर्चा केली. त्यांनी स्वबळाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य
संस्थेमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. या दृष्टीने काँग्रेस स्बवळावर लढण्याची
तयारी करत असल्याचे पटोलेंनी गांधींसोबत झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले आहे.
नाना
पटोले गेल्या काही दिवसांपासून स्वबळाची भाषा सातत्याने करत होते. त्यामुळे
सध्याच्या महाविकासआघाडी मध्ये धुसफूस असल्याचे दिसत असतानाच, आज पटोले यांनी
विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य करण्याचे टाळत, “त्याला अजून तीन वर्षे वेळ आहे” असे
सांगून वेळ मारून नेली आहे. त्याचवेळी तूर्तास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
कॉंग्रेस चमकदार कामगिरी करेल असा विश्वास पटोले यांना आहे.
माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/