Type Here to Get Search Results !

वारकरी परंपरेचा आदर करणाऱ्या उमेश कोकरे यांचे कार्य कौतुकास्पद; गुरुपौर्णिमा कार्यक्रमात वारकऱ्यांनी व्यक्त केली भावना

 



पुणे, दि. २४ (चेकमेट टाईम्स): “वेळ आली ना, मग पैसा नाही, माणसाची साथ महत्वाची असते आणि ती साथ देणारा माणूस म्हणजे उमेश कोकरे” अशी भावना उत्तमनगर परिसरातील सर्वच ज्येष्ठ, वारकरी व्यक्त करत आहेत. रासप’चे पुणे शहर युवक अध्यक्ष उमेश कोकरे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त उत्तमनगर मधील विठ्ठल मंदिरात “वारकरी संप्रदायाचा सन्मान करत, त्यांचे गुरुपूजन केले” यावेळी वारकरी मंडळीनी ही भावना व्यक्त केली.

 संभाजी ब्रिगेड’ने अगोदर छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख बंद करावा; रासप’चा ब्रिगेडवर पलटवार

यावेळी बोलताना, उमेश कोकरे आर्थिकदृष्ट्या अतिश्रीमंत नसला तरी, मनाने श्रीमंत आहे. कोणाला रुग्णालयीन उपचार हवे असतील तर हा तरुण माणुसकीच्या नात्याने, त्या व्यक्तींच्या नातेवाईकांच्या अगोदर रुग्णालयांमध्ये हजार होतो. कोरोना काळात तर नातेवाईकांनीही ज्यांना विचारले नाही, अशांच्या आरोग्याची काळजी कोकरे यांनी घेतल्याने वारकऱ्यांनी कोकरे यांचे कौतुक केले.

 माझ्या अंगावरील चामडे काढून दिले तरी खडकवासल्याच्या मतदारांचे उपकार फिटणार नाहीत: महादेव जानकर

यावेळी सर्व श्री ह.भ.प. दत्तात्रय तोंडे, युवराज महाराज गोसावी, सुभाष शेटे, अनपट, शिंदे यांच्यासह उपस्थित वारकऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन उमेश कोकरे, बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत मोरे, हाडवैद्य डॉ निखिल पवार, एन.डी.ए .रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ शाहबादी, खजिनदार राहुल येलगुंडे, सुदर्शन मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल धावडे, मृदंगमनी गोपाळ निढाळकर, विजय  भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 रासप पुणे मनपा निवडणुकीत या या जागा लढवणार; महादेव जानकर यांचे स्पष्ट संकेत

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.