पुणे, दि. ३
(चेकमेट टाईम्स): स्वतःजवळ घातक शस्त्र बाळगून मारहाण करून गंभीर दुखापत करणे,
बेकायदेशीर जमाव जमून मारामारी करणे, हत्याराने दुखापत करणे दहशत निर्माण करणे,
जनतेच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करणे, महिलांचा विनयभंग करणे, अपहरण करणे
वगैरे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ ३ मधील
तिघांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सह-आयुक्त डॉ.
रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग
डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त
पौर्णिमा गायकवाड यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय
तसेच पुणे जिल्हा परिक्षेत्रातून १ वर्षाकरिता तडीपार केले आहे.
यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगार जमीर मोहिदीन शेख (वय.27), मयूर उर्फ चीक्या शरद कानगुडे (वय. 23 दोघेही रा. सागर कॉलनी, कोथरूड, पुणे) आणि दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगार विशाल बाबासाहेब गायकवाड (वय. 32 रा.गणेश मळा, सिंहगड रोड, पुणे) अशी एक वर्षाकरिता तडीपार केलेल्यांची नावे आहेत. तडीपारीच्या काळात संबंधित इसम आढळून आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उप आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी केले आहे.
माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/