Type Here to Get Search Results !

कर्वेनगर मधील दोन अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची कारवाई; इथेच जाहले माणुसकीचे दर्शन

 

पुणे, दि. १८ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिका बधानाकाम विकास विभाग झोन क्र. ६ च्या वतीने कर्वेनगर प्रभाग क्र. ३१ मधील २ अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई करत जवळपास २ हजार ५०० चौरसफूट बांधकाम पाडण्यात आले.

 कर्वेनगरमध्ये सहाआसनी रिक्षावर भल्या पहाटे झाड पडले; सुदैवाने जीवितहानी टळली

कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, उप-अभियंता दीपक मांजरेकर, दत्तात्रय टकले यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता विठ्ठल मुळे, गजानन सारणे, रामदास पवार यांच्या पथकाने १ जेसीबी, १ गॅस कटर, पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या पोलीस बंदोबस्तात भारत कॉलनी आणि हिंगणे होम कॉलनी मधील दोन बांधकामांवर ही कारवाई केली.

 फोन पे वापरणाऱ्या व्यापाऱ्याला बँकेने लावले २३ हजार रुपयांचे सेवा शुल्क; पुण्यातील घटनेने खळबळ

स्थानिक पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने मोठी कारवाई करता आली नाही. वारंवार स्थानिक पोलीस स्टेशनचा बंदोबस्त मागूनही मिळत नसल्याने, अनधिकृत बांधकामे रोखण्यात अपयश येते आहे. पोलिसांचा बंदोबस्त मिळाल्यास अनधिकृत बांधकामे रोखता येतील. आता भारत कॉलनी मध्ये कारवाई केलेल्या ठिकाणी समोर सुरु असलेल्या फुटिंग मधील कामाला देखील नोटीस देण्यात आली असून, आगामी काळात फुटिंग मध्येच कामे रोखणार असल्याचे कनिष्ठ अभियंता विठ्ठल मुळे यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले.

 किडन्या विका पण कर्जाचे हप्ते भरा, फायनान्स कंपन्यांची ग्राहकांना दमदाटी; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

इथेच जाहले माणुसकीचे दर्शन

आतापर्यंत आपण अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई करताना पाहिले असेल, अनुभवले असेल. त्यातील १०० % बांधकाम कारवाई मध्ये संबंधित बांधकाम मालकांकडून विरोध हा होतोच. बांधकाम मालक बलाढ्य किंवा राजकीय व्यक्तींशी संबंधित असेल तर अधिकाऱ्यांना अरेरावी देखील होते. मात्र भारत कॉलनी मध्ये करण्यात येत असलेल्या कारवाई दरम्यान दिसले ते माणुसकीचे दर्शन... ज्या घरावर ही कारवाई चालू होती, त्या घराच्या भिंती पाडून, ब्रेकरने स्लॅब तोडण्यात येत होता. हे काम चालू असताना ज्यांचे ते घर होते, त्यांच्या घरातील ज्येष्ठ महिला कारवाई करत असलेल्या पथकातील सर्वांसाठी चहा पाणी घेऊन आल्या. त्यांच्या या कृतीने पालिकेचे अधिकारी कर्मचारी अवाक झाले नसतील तर नवलं. मात्र या चहा पाण्याचा पालिकेच्या कारवाईवर काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी आपले काम पूर्ण करूनच पुढच्या कारवाईकडे प्रस्थान केले.

 माझा जनसंपर्क पुण्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात; उद्योजक सुनील मारणे

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.