Type Here to Get Search Results !

वारजे रामनगर मध्ये हत्यारे फिरवत टोळक्याची दहशत; दोघांवर जीवघेणा हल्ला, घराची केली नासधूस

 

पुणे, दि. ३ (चेकमेट टाईम्स): वारजे पोलीस स्टेशन हद्दीतील रामनगर भागामध्ये एका टोळक्याने कोयते, तलवारी फिरवून दहशत माजवत एकाच्या घरावर जीवघेणा हल्ला केला. यात एका कुटुंबातील दोघेजण गंभीर जखमी झाले असून, तिघांवर वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पुण्यातील सर्वात शुद्ध, कडक चहा, भिलारे बासुंदी चहा; एकदा प्याल तर दुसऱ्यांना विसरून जाल

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. १ ऑगस्ट रात्री साडेआठच्या सुमारास जुन्या वादातून फिर्यादीच्या सिद्धार्थ चौक येथील घरात घुसून, हल्ला चढवला. यात कोयत्याचे वार अडवण्याच्या प्रयत्नात फिर्यादीच्या हाताचा अंगठा तुटला असून, त्यांच्या वडिलांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी हल्लेखोरांनी घरातील टीव्ही आणि इतर वस्तूंची तोडफोड देखील केली. तर जाताना हातातील हत्यारे फिरवून रामनगरच्या रस्त्यांवर दहशत निर्माण केली. अचानक दुचाकीवरून आलेल्या या हल्लेखोरांच्या आवाजाने रामनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 दोन्ही हाताचे पंजे तुटले, पण हा खचला नाही, पुन्हा उभा राहिला त्याच जिद्दीने आणि नव्या उमेदीने

राहुल भडके (वय.२९ रा.सिद्धार्थ चौक, रामनगर, वारजे, पुणे) यांनी वारजे पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड पुढील तपास करत आहेत.

 पीएमपी बस खाली चिरडताना महागडी जग्वार थोडक्यात वाचली; पार्किंग केलेली रिकामी बस धावली उताराने उलटी

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.