पुणे, दि. २५ (चेकमेट टाईम्स): प्रभाग रचना एक, दोन,
तीन किंवा चारची झाली तरी भाजपचीच महापालिकेत सत्ता येईल असा
विश्वास शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केलाय. निवडणूक आयोगाच्या वतीने
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचे संकेत
दिले असून, त्यानुसार प्रभागरचना करण्याबाबतचे आदेश महानगरपालिकांच्या आयुक्तांना
दिले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी
प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भमिका स्पष्ट केली आहे.
मुळीक पुणे म्हणाले, कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही भाजपने पुणे महापालिकेच्या
माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास केला आहे, त्यामुळे पुणेकर
भाजपवर विश्वास टाकतील याची खात्री आहे. केंद्र, राज्य आणि
मनपात भाजपची सत्ता असताना पुण्याच्या विकासाने मोठी गती आली होती. परंतु राज्यात
महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर विकासाचा वेग कमी झाला. महाविकास आघाडीने
शहरासाठी निधीची कोणतीच तरतूद केली नाही. उलट नियोजनशून्य कारभाराला पुणेकर
कंटाळले असून, राज्य सरकारच्या विरोधात संतापाची भावना आहे.
त्याचा फायदा भाजपला होईल, असा विश्वास मुळीक यांनी व्यक्त केलाय.
तर केवळ राजकीय फायदा विचारात घेऊन राज्य सरकार वार्ड
रचना करीत आहे. परंतु कशीही रचना झाली तरी भाजपला कोणतीच हरकत नाही. विकासाच्या
जोरावर भाजप पुन्हा विजयी होईल. आम्ही शहरातील मोठे प्रकल्प पूर्ण करीत असताना
स्थानिक विकास निधीतून सुमारे २ हजार कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत.
कोरोनाच्या काळात चांगले काम केले केले आहे. संघटनात्मक रचना पूर्ण झाल्या आहेत.
शहरातील सर्व बूथवर बूथ प्रमुख, बूथ समिती, शक्ती केंद्र प्रमुख अशा रचना पूर्ण
झाल्या असून. त्यांच्या माध्यमातून मतदार संपर्क अभियान सुरू झाले आहे. त्यामुळे
आम्हाला यशाची खात्री आहे असाही विश्वास जगदीश मुळीक यांनी व्यक्त केलाय.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची लिंक
: https://twitter.com/checkmate_times