पुणे, दि. २८ (चेकमेट टाईम्स): वारजे मधील त्या राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम सेंटर पुन्हा एकदा
चोरट्यांकडून टार्गेट करण्यात आले असून, या बँकेच्या एका एटीएम मध्ये दोन
महिन्यांपूर्वी चोरी केल्यानंतर, चोरट्याने आता त्याच बँकेचे दुसरे एटीएम टार्गेट
केले आणि त्याच पद्धतीने चोरी करण्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ती चोरी
झाल्यानंतर देखील बँकेने काहीही बोध न घेता, या एटीएम सेंटरला देखील सुरक्षारक्षक
नियुक्त केला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत वारजे पोलीस स्टेशन
मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, महिला पोलीस हवालदार गौरी राजगुरू पुढील
तपास करत आहेत.
शुक्रवार दि.४ जून २०२१ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या
सुमारास वारजे मधील कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गावर माई मंगेशकर
रुग्णालयाशेजारी असलेल्या व्हायोला सोसायटीच्या आवारात स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)
या राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम सेंटर असून, एटीएमच्या मागील बाजूस यूपीएस इन्व्हर्टरच्या ४० हजार रुपये किमतीच्या
असलेल्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या होत्या.
आता पुन्हा त्याच स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय)
रोझरी शाळेजवळील, करण प्लाझा मध्ये असलेल्या एटीएमच्या मागील बाजूस असलेल्या त्याचं प्रकारच्या यूपीएस
इन्व्हर्टरच्या ३० हजार रुपये किमतीच्या असलेल्या बॅटऱ्या शनिवार दि.३१ जुलै २०२१
रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना समोर आली
आहे. एकूणच ४ जून आणि त्यानंतर लगेच २ महिने पूर्ण होण्याअगोदर ३१ जुलै’ला त्याच
बँकेच्या, त्याच प्रकारच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने विषय चर्चेचा झाला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारी
प्रचंड वाढली आहे. अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे आगामी काळात चोऱ्या, दरोडे याचे प्रमाण वाढण्याचे अंदाज अनेकांनी बांधले
आहेत. त्याची परिणीती वाढत असलेल्या चोऱ्यांच्या घटनांवरून समोर येते आहे. त्यामुळे
सर्वकाही पोलिसांवर न टाकता, नागरिकांनी देखील स्वत:ची जबाबदारी समजून घेत, आपल्या
आणि आपल्या शेजाऱ्यांच्या स्वकष्टार्जित साधन संपत्तीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. “घराचा
शेजारी, खरा पहारेकरी” या संकल्पनेवर आधारित कार्यशैली ठेवली गेल्यास यामध्ये
सर्वांचेच हित सामावले जाईल.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची लिंक
: https://twitter.com/checkmate_times