Type Here to Get Search Results !

वारजे मध्ये ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले

 

पुणे, दि. १९ (चेकमेट टाईम्स): गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटनांना आळा बसला, घटना कमी झाल्या म्हटले जात असताना, पुन्हा एकदा ज्येष्ठांच्या गळ्यातील दागिने, मोबाईल हिसकावण्याच्या घटना सुरु झालेल्या दिसत असून, वारजे कर्वेनगर परिसरातील काकडे सिटी समोरील मुख्य रस्ता असलेल्या गालिंदे पथावरून एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

हायवे परिसरात मंगळसूत्र चोऱ्या करणारा एकजण गजाआड; पोलिसांचीच रेकी करून करायचा चोऱ्या


बुधवार दि.१८ ऑगस्ट २०२१ सकाळी दहा ते सव्वा दहाच्या सुमारास ज्येष्ठ पती पत्नी गालिंदे पथावरून चालत जात असताना, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या जवळ दुचाकी आणली आणि काही समजायच्या आत, महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून, चोरून नेले. भल्यास सकाळी सकाळी आणि मुख्य रस्त्यावर ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. याबाबत ५९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने वारजे पोलिसात तक्रार दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर तपास करत आहेत.

 

किल्ले रायगडच्या टकमक टोकाखाली गाडले होते दीड कोटींचे दागिने; चार जण गजाआड


माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.