Type Here to Get Search Results !

वारजे मध्ये पिस्तुल आणि काडतुसांसह सराईत गजाआड; गुन्हे शाखेची कारवाई

 


पुणे, दि. २० (चेकमेट टाईम्स): वारजे मधील मुख्य रस्त्यावर पिस्तुल आणि काडतुसासह थांबलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने जेरबंद केले.

 

वारजे मध्ये गुन्हेगारी टोळीवर मोक्का; संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी शंकर खटके सरसावले


पुणे शहरातील गुन्हेगारी नष्ट व्हावी आणि गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरिता अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेऊन, आवश्यक तेथे प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्त यांनी पोलीस प्रशासनाला आदेश दिलेले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ३ चे पथक गस्त घालत असताना, पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर यांना वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकजण कमरेला पिस्तुल लावून थांबलेला असल्याची माहिती मिळाली.

 

वारजे माळवाडी मुख्य रस्त्यावर झाड पडून एकजण जखमी | पहा दुर्घटना आणि मदतकार्याचे पूर्ण चित्रण


मिळालेल्या माहितीबाबत खात्री करत, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक गुन्हे) सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, सहायक पोलीस फौजदार निंबाळकर, पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर, पोलीस नाईक कल्पेश बनसोडे, पोलीस शिपाई प्रकाश कट्टे, सुजित पवार, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे वारजे हायवे चौकाजवळील वेदांती फॅमिली गार्डन रेस्टॉरंट व बार जवळील सार्वजनिक रस्त्यावर सापळा लावत, एका संशयिताला ताब्यात घेतले.

 

वारजे माळवाडी मध्ये डोंगरावरून बस ढासळली; सुदैवाने जीवितहानी टळली


त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि एक काडतूस असा ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याबाबत रोहन बाळासाहेब गबदुले (वय.२७ रा.कीरकटवाडी, ता.हवेली, जि.पुणे) याच्याविरुद्ध वारजे पोलीस स्टेशन मध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगलेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आली आहे. रोहन गबदुले हवेली पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याच्यावर दंगा करण्यासारखे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे पुढील तपास करत आहेत.


वारजे मध्ये देखील होर्डिंगमुळे नागरिकांचा जीव धोक्यात; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष 


माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.