पुणे, दि. ३
(चेकमेट टाईम्स): उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत लोखंडी धातूच्या गावठी बनावटीच्या
पिस्तुल आणि एक काडतुसासह एकाला ताब्यात घेण्यात पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा
युनिट ३ ला यश आले आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात
आलेला असून, उत्तमनगर पोलीस तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट ३ मधील पोलीस
हवालदार संतोष क्षीरसागर यांना उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत, एनडीए रस्त्यावरील
महालक्ष्मी गार्डन समोर एकजण कमरेला पिस्तुल लावून थांबला असल्याची खबऱ्यामार्फत माहिती
मिळाली होती. त्यानुसार पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ
रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे,
सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ३ चे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, सहायक पोलीस
फौजदार निंबाळकर, पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर, पोलीस नाईक नेवसे, पोलीस शिपाई
क्षीरसागर, कट्टे यांच्या पथकाने सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार संशयित
वर्णनाच्या तरुणाला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे ४० हजार ४०० रुपये किमतीचे
गावठी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले.
यावरून संतोष
यशवंत शिंदे (वय.२६ रा.ताडीवाला रोड, बंडगार्डन, पुणे) यास अटक करण्यात आलेली
असून, उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगलेप्रकरणी
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तमनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/