Type Here to Get Search Results !

वारजे उड्डाणपुलावर दोन ट्रकचा विचित्र अपघात; चेंगरलेल्या चालकाची अग्निशमन दलाने केली थरारक सुटका

 

पुणे, दि. ११ (चेकमेट टाईम्स): वारजे उड्डाणपुलावर भल्या सकाळी ट्रक आणि कॉंक्रीट मिक्सरच्या झालेल्या अपघातात ट्रकचालक केबिनमध्ये अडकून पडल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, ट्रकचालकाची सुखरूप सुटका केली. (Accident on warje highway flyover, truck driver resque by fire brigade)

 वारजे उड्डाणपुलावर मालट्रक पेटला

याबाबत सिंहगड रोड अग्निशमन दल प्रमुख प्रभाकर उमराटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवार दि. ११ ऑगस्ट २०२१ सकाळी सहाच्या सुमारास अग्निशमन दलाला वारजे उड्डाणपुलावर दोन वाहनांचा अपघात झाला असून, त्यातील एका वाहनात चालक अडकून पडल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तांडेल शिवाजी मुजुमले, चालक सतीश देशमुख, जवान शिवाजी आटोळे, संतोष नलावडे, प्रमोद मरळ, विलास घडशी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. (Sinhgad road fire brigade)

 वारजे उड्डाणपुलाजवळ बस ओढ्यात कोसळून अपघात, १८ जण जखमी

यावेळी कात्रज वरून चांदणी चौकाकडे जाण्याच्या दिशेने जात (katraj to chandani chowk) असलेल्या कॉंक्रीट मिक्सर क्र. एमपी ०९ एचएफ ५९८० ला कंटेनर ट्रक क्र. एमएच १२ एमव्ही ५५१२ मागून धडकलेल्या अवस्थेत होता. यावेळी कंटेनरचा चालक जखमी अवस्थेत अडकलेला असल्याचे दिसताच, अग्निशमन जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता, मॅन्यूअल ऑपरेटिंग स्प्रेडर, कटावणी, पहार यांच्या सहाय्याने ट्रकचा दरवाजा आणि बॉडी सरकवून चालकाला काढण्याचे प्रयत्न सुरु केले. दरम्यान अपघाताचे गांभीर्य पाहता प्रभाकर उमराटकर यांनी रेस्क्यू वाहनाला देखील पाचारण केले होते. रेस्क्यू वाहन घटनास्थळी दाखल होताच, मदतीचा वेग वाढवत. अत्याधुनिक स्प्रेडर वापरून कंटेनरच्या केबिनमध्ये प्रवेश मिळवून अग्निशमन जवानांनी चालकाची सुखरूप सुटका केली.

 


यावेळी चालक राजू रामाप्पा लकंडे (वय.३१ रा.वरातवाड, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, कर्नाटक) याच्या दोन्ही पायांना दुखापत झालेली आढळून आली. त्याला वारजे पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात हलवून त्याचे प्राण वाचवले असून, याबाबत वारजे पोलीस स्टेशन (warje police station) मध्ये अपघात दाखल करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासात पुढे येईल. मात्र अग्निशमन दलाने दाखवलेल्या समयसुचकतेमुळे अपघातग्रस्ताला वेळीच मदत उपलब्ध होऊन, त्याचा जीव वाचवल्याने अग्निशमन दलावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 


माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.