Type Here to Get Search Results !

वारजे मध्ये भंगाराच्या गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास आग; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

 

पुणे, दि. २१ (चेकमेट टाईम्स): वारजे हायवे चौकातून कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भंगाराच्या गोदामाला शनिवार दि.२१ ऑगस्ट २०२१ मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने अग्निशमन दलाचे पथक वेळेत हजार झाल्याने आगीचे प्रमाण वाढून होणारी संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

 

 नामांकित ब्रॅडच्या उत्पादनांसह वारजे उड्डाणपुलावर मालट्रक पेटला

 

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १ च्या सुमारास कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याजवळ असलेल्या भंगारच्या गोदामाला आग लागल्याचे सामाजिक कार्यकर्ते पराग ढेणे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या छोट्या आगीचे रुपांतर प्रचंड मोठ्या आगीत होण्याची शक्यता लक्षात घेत, याबाबत अग्निशमन दलाला तातडीने कळवले.

 

 वारजे उड्डाणपुलाजवळ बस ओढ्यात कोसळून अपघात, १८ जण जखमी

 

यावेळी कोथरूड अग्निशमन दलाचे प्रमुख गजानन पाथ्रूडकर, बाबू शीतकल, अतुल ढगळे, योगेश चव्हाण, दीपक पाटील शिळीमकर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शेजारील पत्र्याच्या शेडकडे आग पसरू लागली होती. शेजारी शेजारी दाटीवाटीने असलेली पत्र्यांची शेड आणि त्यात असलेल्या ज्वलनशील पदार्थांचा साठा गृहीत धरून अग्निशमन दलाने आग पसरणाऱ्या बाजूकडून आगीवर नियंत्रण मिळवत पुढील सर्व शेड’सह भंगाराच्या गोदामाची आग आटोक्यात आणली.

 


या सर्व पत्र्यांच्या शेड मध्ये स्नॅक सेंटर, हॉटेल, बांबूचे गोदाम, पान टपऱ्या त्याचबरोबर एक अवैद्य दारूचे दुकान असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जर ही आग पसरली असती, तर या सर्व दुकानांमध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थांनी, गॅस सिलेंडर आणि बांबू गोदामासारख्या अति-ज्वलनशील वस्तूंनी पेट घेतला असता, तर येथे वित्तहानी बरोबरच जीवितहानी झाली असती. एकूणच प्रसंगावधान राखत पराग ढेणे यांनी अग्निशमन दलाला कळवले आणि अग्निशमन दलाने देखील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी केलेल्या प्रत्यक्ष कृतीमुळे वारजे मधील ही मोठी दुर्घटना टळली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

वारजे माळवाडीत पान टपरी आगीत भस्मसात

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागलेल्या या दुर्घटनास्थळाच्या शेजारी अगोदर बेकायदेशीर ताडी गुत्ता थाटण्यात आला होता. मात्र नगरसेविका लक्ष्मी दुधाणे यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह तेथे जावून ताडीगुत्ता उध्वस्त केला होता. हे ठिकाण कात्रजकडे जाणाऱ्या प्रवाशांचा थांबा असल्याने येथे सहाआसनी रिक्षा, तीन आसनी रिक्षांसह बसची वाट पाहत थांबणाऱ्या महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची मोठी संख्या असते. त्यांना होत असलेला त्रास पाहता लक्ष्मी दुधाणे यांनी ताडीगुत्ता उध्वस्त केला होता. मात्र तेथे आता पुन्हा दारूचे दुकान थाटले गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दारूने पेट घेतला असता तर? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतोय.

 वारजे मध्ये लिफ्ट डक्टच्या वायरिंगला आग, इमारतींची अग्निशमन यंत्रणा ठरली कुचकामी

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.