पुणे, दि. २५ (चेकमेट टाईम्स): कोरोना महामारीमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे.
त्यात मोफत मिळणाऱ्या लसींचा शहरात तुटवडा होत असताना, हातावर पोट असलेल्या
मोलमजुरी करणाऱ्यांना लस घेतली असल्याशिवाय रोजगार मिळणे मुश्कील झाले. या
समस्येच्या पार्श्वभूमीवर एरंडवणेच्या गणेशनगर, १० नंबर चाळ मधील श्री शनि मारुती
बाल गणेश मंडळ ट्रस्ट आणि सेवा आरोग्य फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने अल्प उत्पन्न गटातील ६६० नागरिकांना मंडळाच्या वतीने मोफत
लसीकरण करण्यात आले.
मुठा नदीपात्रात शेकडो दुचाकींचे विसर्जन; अलर्टकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांची वाहने अडकली
यावेळी काही
ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोचता येत नाही, अशांना देखील घरी जाऊन
लसीकरण करण्याचे मोठे सामाजिक काम या मंडळाने केले. सद्यस्थितीला दहीहंडी उत्सव
असेल की गणेशोत्सव आणि त्यानंतर नवरात्री येते आहे. या पार्श्वभूमीवर अशा मंडळानी
या श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट या मंडळाचा आदर्श घेऊन आपापल्या भागात
उपक्रम राबवल्यास पुणे शहरच काय महाराष्ट्र आणि देश लसवंत झाल्याशिवाय राहणार नाही
असे मत अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी व्यक्त
केले.
पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत पाणी चोरी; पाणीपुरवठा विभागाच्या धाडीत जवळपास ३० मोटारी जप्त
यावेळी सतीश जोशी,
अनिल गुत्ती, डॉ. प्रियांका मोहोळ, मृण्मयी आसवर, मनोज पाटील, गणेश शेलार यांच्यासह
प्रभागातील सर्वच पक्षांचे राजकीय, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. लसीकरण
उपक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सचिन पवार, सेवा आरोग्य फौंडेशनचे दीपक
अष्टपुत्रे यांनी केले होते. तर संजय घाणेकर, दिनेश पेंढारे, विजय सातपुते, केतन
गायकवाड, अमित पवार, गणेश मोरे, सचिन भुवड, तानाजी फाटक, अरुण सातपुते यांनी
यशस्वी व्यवस्थापन केले.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची लिंक
: https://twitter.com/checkmate_times