पुणे, दि. ७
(चेकमेट टाईम्स): कोथरूड मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या भांडणाचा राग मनात
धरून एकाचे घर जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये
कोणीही जखमी झाले नसले तरी घराच्या बाजूला लावलेली रिक्षा आणि एक दुचाकी आगीत जळून
भस्मसात झाली आहे. याबाबत रवींद्र कडू (वय.३७, रा.कोथरूड, पुणे) यांनी कोथरूड
पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी तपास करत
आहेत.
याबाबत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कडू यांच्या म्हातोबानगर मधील घरासमोर
रिक्षा आणि दुचाकी लावलेली असताना, ६ ऑगस्ट २०२१ च्या मध्यरात्री २.३० च्या
सुमारास संशयित इसमाने फिर्यादी कडू यांच्या भावासोबत असलेल्या जुन्या भांडणाचा
राग मनात धरून, फिर्यादी कडू यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र घराला
संरक्षण जाळी असल्याने घराला आग न लागता, ती जाळीवर असलेल्या कपडे, पोत्यांना
लागली. ही आग भडकून घराच्या बाहेर लावलेली रिक्षा आणि दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी
पडली.
यामध्ये कडू
यांचे जवळपास ४० हजार रुपयांचे नुकसान झालेले असून, अद्याप कोणालाही अटक केलेली
नाही. कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, पोलीस
उपनिरीक्षक रतिकांत कोळी पुढील तपास करत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कडू
कुटुंबियांसह परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. मात्र सुदैवाने यात कोणतीही
जीवितहानी झाली नाही.
माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/