पुणे, दि. २१ (चेकमेट टाईम्स): भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्पोर्टझिला फुटबॉल अकॅडमी आणि उत्तमनगरचे सरपंच सुभाष नाणेकर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेत नुकत्याच समाविष्ठ झालेल्या कोंढवे धावडे गावात आयोजित करण्यात आलेल्या नॉकआउट फुटबॉल चषक स्पर्धेत पुण्याचा पन्ना बॉईज संघ विजेता ठरला. मुंबईच्या प्रतिस्पर्धी कलिना रेंजर्स संघाचा पन्ना बॉईजने ५ – ० ने पराभव करत नॉकआउट चषकावर आपले नाव कोरले. ग्रामीण संमिश्र भाग असलेल्या पंचक्रोशी मध्ये आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच फुटबॉल स्पर्धा होती.
भारत भ्रमण ग्रुपकडून ५०० विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप; स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम
यावेळी विजेत्या संघाला चषक आणि २१ हजार रुपयांचे रोख
परितोषित देण्यात आले. तर उपविजेत्या ठरलेल्या कलीना रेंजर्स या मुंबई येथील संघाला
१५ हजार रुपये रोख आणि चषक देण्यात आला. या स्पर्धेत एकूण 23 संघांनी सहभाग घेतला
होता. त्यातील तृतीय क्रमांकाचे विजेते ठरला तो स्थानिक कोंढवे-धावडे येथील बी एस
बॉईज संघ त्यांना 11 हजार रुपये रोख आणि चषक, तर चतुर्थ क्रमांकावर नॉर्थन हॅमर्स
हा संघ राहिला त्यांना ७ हजार रुपये रोख आणि चषक बक्षीस देण्यात आले.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ,
खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर, उद्योजक अनिल कांबळी, सारंग
राडकर, प्रवीण दांगट, राहुल मोरे, हनुमंत गायकवाड, भगवान धावडे, अमोल कारले, संदीप
पोकळे, बापू सरपाटील, संदीप देशमुख, गणेश वांजळे यांच्यासह पंचक्रोशीतील
सर्वपक्षीय सामाजिक – राजकीय कार्यकर्ते, कला, क्रीडा, नाट्य, साहित्य क्षेत्रातील
मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुधीर कुमार, अक्षय कांबळे, अजय सुलेवान, गोरख कांबळे,
दीपक मेश्राम यांच्या निरीक्षणाखाली ह्या स्पर्धा पार पडलेल्या या नॉकआउट फुटबॉल
चषक स्पर्धांमध्ये, बी एस बॉईज विरुद्ध पन्ना बॉईज
यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ४ विरुद्ध ३ गुणांनी
पन्ना बॉईज विजेते ठरल्याने ते अंतिम फेरीत दाखल झाले. तर कलिना रेंजर्स विरुद्ध नॉर्थन
हॅमर्स यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या
सामन्यांमध्ये कलीना रेंजर्स ४ विरुद्ध ० गुणांनी एकतर्फी विजयी ठरत ते अंतिम
फेरीत पोचले. यामध्ये कलिना रेंजर्स आणि बी एस बॉईज यांच्यामध्ये अंतिम सामन्याची
लढत होऊन नॉर्थन हॅमर्सला एकही गुण मिळवून न
देणाऱ्या कलिना रेंजर्सला पन्ना बॉईजने एकही गुण मिळवून न देता ५ विरुद्ध ०
गुणांनी विजय पटकावला.
सामान्यपणे क्रिकेटचे सामने होत असलेल्या
या ग्रामीण उपनगरी भागात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि राष्ट्रीय
दर्जाच्या फुटबॉल स्पर्धा होत असल्याने हे तीन दिवसीय सामने पाहण्यासाठी तरुणांनी
अलोट गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. याच तरुणांमध्ये खेळण्याची उमेद जागृत व्हावी
आणि आपल्या भागाचे नाव त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवावे
याकरिता या स्पर्धांचे आयोजन केल्याचे सरपंच सुभाष नाणेकर यांनी सांगितले.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक
पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची
लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या
इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/