पुणे, दि. ३० (चेकमेट टाईम्स): पुणे शहर पोलीस
आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी शहरात अस्तित्वात
असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्याचे सक्त आदेश देऊन ठोस कारवाई
करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहरात दाखल
झाल्यापासून मोक्काच्या कारवायांचे अर्धशतक कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पूर्ण
केले. एक वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर ११ महिन्यांमध्ये तब्बल ५० मोक्का’च्या
कारवाया करत आयुक्तांनी पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्था शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न
केला आहे.
5 जुलै 2019 रोजी रात्री दोन वाजेच्या
सुमारास, आरोपी नामे बल्लूसिंग प्रभूसिंग टाक, उजालासिंग प्रभुसिंग टाक आणि पळून
गेलेले त्यांचे साथीदार सोमनाथ नामदेव गारोळे, पिल्लूसिंग कालुसिंग जुनी, जलसिंग
रजपूतसिंग दुधानी आणि गोरखसिंग जागासिंग टाक यांनी तवेरा गाडी मधून वेगवेगळ्या
धारदार दरोडा टाकण्याच्या हत्यारांसह येऊन कोथरूड मधील पंचरत्न सोसायटी मधील दोन
फ्लॅट कुलूपबंद असताना, त्यांचे कुलूप तोडून, दरोडा टाकून पळून जात असताना, पोलीस
अधिकाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्यावर धारदार
हत्याराने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करून, फिर्यादी करत असलेले शासकीय
कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण केल्यासह घातक हत्यारे बाळगल्याचा आरोपी नामे
बल्लूसिंग प्रभुसिंग टाक आणि इतर ५ आरोपींविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा
दाखल करण्यात आला होता.
कोथरूड मधील या बड्या खाजगी रुग्णालयांना अग्निशमन दलाच्या नोटीसा; फायर ऑडीट मध्ये आढळले दोष
दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळीचा प्रमुख बल्लूसिंग टाक हा त्याच्या इतर साथीदारांसह संघटित गुन्हेगारी चालवून 2008 सालापासून गंभीर स्वरूपाचे शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करत असून, बल्लूसिंग टाक याने गुन्हे करताना वेगवेगळे साथीदार घेऊन आपल्या टोळीची दहशत आणि वर्चस्व राखण्याकरता, तसेच स्वतःचे आणि टोळीचे अवैध आर्थिक फायदा करता दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र बाळगून दहशत माजवणे या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे चढत्या क्रमाने केले आहेत. सदर टोळी प्रमुख आणि त्याच्या टोळीचे सदस्य यांना गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने, त्यांच्यावर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई, तसेच हद्दपारी सारखी ठोस कारवाई करून देखील त्यांचे गुन्हेगारी वर्तनात काही एक चांगला परिणाम झाला नाही. त्यामुळे त्यांच्यावर ठोस आणि कडक कारवाई करणे आवश्यक होते.
त्यानुसार पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ
गुप्ता यांनी पुणे शहरातील अस्तित्वात असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड
करण्याचे सक्त आदेश देऊन, ठोस कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. याप्रमाणे बल्लूसिंग
टोळीवर कोथरुड पोलिस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कायद्याअंतर्गत
कारवाई होण्याकरिता कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे
यांनी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग संजय शिंदे यांना परिमंडळ 3 च्या
पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड आणि कोथरूड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन
टोम्पे यांच्यामार्फत मकोका कारवाईचा प्रस्ताव सादर केला असता, सदर प्रस्तावानुसार
संजय शिंदे यांनी आरोपी बल्लूसिंग प्रभूसिंग टाक आणि त्याच्या टोळीतील इतर सक्रिय
सदस्य यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास मंजुरी दिल्यानुसार सदरील गुन्ह्यामध्ये आरोपींविरुद्ध
मोक्का कायद्याप्रमाणे कारवाई केली असून, सदर गुन्ह्याचा तपास कोथरूड विभाग सहाय्यक
पोलीस आयुक्त गजानन टोम्पे हे करीत आहेत.
सदर मोका कायद्याची कारवाई पोलीस आयुक्त
पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त
पश्चिम प्रादेशिक विभाग संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड,
सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ
पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बडे, तपास
पथकातील पोलिस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस नाईक सचिन कुदळे, भास्कर बुचडे,
पोलीस शिपाई अजय सावंत यांनी वेळेत तयार करून कोणत्याही त्रुटीविना वरिष्ठ
कार्यालयास सादर करून उत्तम कामगिरी केली आहे.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ
गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन
शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे
सराईत गुन्हेगार यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समूळ
उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले
आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत आत्तापर्यंत झालेल्या ही ५० वी
कारवाई आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची लिंक
: https://twitter.com/checkmate_times