पुणे, दि. ७
(चेकमेट टाईम्स): सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. त्यातच पावसाळ्यामुळे डेंग्यू
सारख्या रोगांनी डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पुणे जिल्हा
प्रमुख रमेश कोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वारजे मधील पतित पावन संघटनेचे निलेश
घारे मित्र परिवाराच्या वतीने गरजवंत सामान्य कुटुंबातील नागरिकांना ५०० मच्छरदाण्यांचे
वाटप करण्यात आले. नागरिक सुरक्षित राहावेत, सुदृढ राहावेत यासाठी या उपक्रमाचे
आयोजन केले असल्याचे निलेश घारे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तेजस
पाबळे, विकास शितोळे, किरण सुतकर यांच्यासह निलेश घारे मित्र परिवार मोठ्या
संख्येने उपस्थित होता. तर कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत कमीत कमी गर्दी
जमवून, सामाजिक अंतर राखत, सॅनिटायझरचा वापर करत हे वाटप करण्यात आले. अनेकांना
घरोघरी जावून मच्छरदाण्या पोचवण्यात आल्या.
माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/