पुणे, दि. १८ (चेकमेट टाईम्स): वारजे तपोधाम
परिसरातील निसर्ग रेसिडेन्सी सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दोन दुचाकींना
मंगळवार दि.17 ऑगस्ट २०२१ च्या मध्यरात्री आग लागण्याची घटना समोर आली आहे.
यामध्ये दोन्ही दुचाकींचा कोळसा झाला असून, याबाबत वारजे पोलिसात तक्रार देण्यात
आली आहे. सदरील घटना अपघात की घातपात याबाबत वारजे पोलीस तपास करत आहेत.
याबाबत रहिवाश्यांनी दिलेल्या माहितीनुसार
मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास निसर्ग रेसिडेन्सी सोसायटीच्या पार्किंग मध्ये
मोठा आवाज दुचाकी मालक अनुप धोत्रे यांना आला. दरम्यान त्यांनी लगेच पार्किंग
मध्ये जाऊन पाहणी केली असता, पार्किंग मधील दोन दुचाकींना मोठी आग लागल्याचे
निदर्शनास आले. यावेळी त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मोठी असल्याने
आणि पूर्ण गाडीने पेट घेतलेला असल्याने त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश
आले. या आगीत दोन्ही दुचाकी पुर्णता जळून खाक झाल्या. याबाबत अनुप धोत्रे आणि दत्ताञय
कदम यांनी तक्रार दिली असून, वारजे पोलीस पुढील तपास करत आहेत.
माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक
पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची
लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या
इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/