पुणे, दि. ७
(चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून “नागरिकांच्या कररूपी
पैशांमधून नागरिकांसाठी” ज्येष्ठ नागरिक कट्टे, वाचनालय कट्टे बांधण्यात येतात.
मात्र गेल्या काही वर्षात या कट्ट्यांची संस्कृती बदलली गेली. नागरिकांनी भरलेल्या
कराच्या पैशातून पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या कट्ट्यांवर पालिकेचेच
नाव न टाकता नगरसेवक स्वत:चा आणि स्वत:च्या पक्षाचा प्रचारच जास्त करत असल्याचे
त्यातून समोर येत आहे. यावर काही सामाजिक संघटनांनी आक्षेप देखील घेतले मात्र त्याला
बहुतेक केराची टोपली दाखवण्यात आली असेल. मात्र याला अपवाद आहेत त्या राष्ट्रवादी
कॉंग्रेस पार्टीच्या वारजे कर्वेनगर प्रभाग क्र.३१ च्या नगरसेविका लक्ष्मी दुधाने.
नगरसेविका लक्ष्मी
दुधाने यांच्या विकास निधीतून आणि पुणे महानगरपालिकेच्या सौजन्याने प्रभाग क्र. ३१
कर्वेनगर वारजे परिसरामध्ये विविध ठिकाणी विकसित केलेल्या चार वाचनालयांचे विविध
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. विशेष म्हणजे या कट्ट्यांवर पुणे
महानगरपालिकेचे नाव ठळक अक्षरात दिसते आणि त्या त्या परिसराचे नाव उद्युक्त केलेले
आढळते. याशिवाय त्या कट्ट्यांना राष्ट्रवादी पक्षाच्या झेंडा अथवा चिन्हाशी
संबंधित कोणतीही रंगसंगती देखील या कट्ट्यावर केलेली नसल्याने नागरिकांना आपण
कोणत्या ठराविक पक्षाच्या कट्ट्यावर बसून चुकी तर करत नाही ना असा संकोच वाटत
नाही. यामुळे या वाचनालयांचा वापर होईल यात शंका नाही.
ह.भ.प.रामचंद्र
पाटलु चौधरी वाचनालय, निळकंठ मित्र मंडळ वाचनालय, हिरकणी - कल्पतरू - श्रमसाफल्य कॉलनी वाचनालय आणि हिंगणे होम कॉलनी
वाचनालय अशी त्या वाचनालयांची नावे असून, ज्ञानोबा शंकर ढेणे, मारुती बाबाजी मानकर, छबुताई बाठे, जयश्री पवार, मालन सूर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते
या वाचनालयांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्यासह
प्रभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर
फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/