पुणे, दि. ५
(चेकमेट टाईम्स): कामगार, मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो, तो मनातून कोणीतरी
वेगळा व्यक्ती असतोच. मात्र त्याच्या संसारिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली त्याच्या
आतील ते सुप्त गुण कायम दबून राहतात. अशा कामगारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे. त्यांना
प्रेरणा देण्याचे काम करत आलेले कमिन्स इंडियाचे उत्कृष्ठ कामगार पुरस्कारप्राप्त
व्यक्तीमत्व आणि कामगार साहित्य चळवळीत गेली अनेक वर्षे सातत्याने योगदान असणारे
कवी राजेंद्र वाघ यांची “महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या राज्यस्तरीय
कार्याध्यक्षपदी” नियुक्ती करण्यात आली आहे.
नवोदित
साहित्यिक कामगारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, कामगारांना प्रशिक्षण
देणे, राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन अशा विविध
प्रकारचे परिषदेचे उपक्रम सुरू असतात. ज्येष्ठ वात्रटिकाकार कविवर्य रामदास फुटाणे
यांच्या हस्ते कवी राजेंद्र वाघ यांना तसे पत्र देण्यात आले. याप्रसंगी परिषदेचे
अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, मुरलीधर साठे, मुकुंद आवटे, आचार्य दिगंबर ढोकले इत्यादी मान्यवर
उपस्थित होते.
याबाबत राजेंद्र
वाघ यांना विचारणा केली असता, आतापर्यंत आपण अनेक कामगारांना साहित्याच्या जवळ
आणण्याचा प्रयत्न केला आहे. तो अपेक्षेपेक्षा अधिक फलद्रूप झालाय, त्यामुळे आगामी
काळात जास्तीत जास्त कामगारांना लिहिते करण्याचा आपला संकल्प असल्याचे वाघ यांनी
चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले. वाघ यांच्या या संकल्पामुळे पुढील काही
वर्षांमध्ये आपल्याला कामगारांमधील साहित्यिक बाहेर पडताना दिसतील याबाबत शंका
नाही. वाघ यांच्या “करू नको सखे शृंगार”, “निर्भय” अशा अनेक कविता लोकप्रिय असून,
त्यांच्या व्यासपीठावरील सादरीकरणात “वन्स मोअर” मिळवणाऱ्या कवितांचा मोठा खजिना
आहे.
माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/