Type Here to Get Search Results !

झाडांना राखी बांधून रक्षाबंधान; ब्राईट फ्युचर क्लबचा आणखीन एक अनोखा उपक्रम

 

पुणे, दि. २५ (चेकमेट टाईम्स): सायकलिंग करणे सायकलिंगबाबतची जनजागृती करत असताना, निसर्ग संवर्धन करणे, सिड बॉल्सची निसर्गात उधळण करणे, वृक्षारोपण करणे आणि अडल्या-नाडलेल्याना मदत करत, सायकल राईडची शतकी वाटचाल करणाऱ्या ब्राईट फ्युचर क्लबने आणखीन एक अनोखा उपक्रम राबवला असून, त्यांनी लावलेल्या झाडांना राख्या बांधून, “तू आमच्याबरोबरच इतरांनाही कोणताही जातीभेद, धर्मभेद न पाळता प्राणवायूचा अविरत पुरवठा करतोस, तुझ्याप्रती कृतज्ञता” असे म्हणत राखीपौर्णिमा साजरी केली.

 सुजाता दत्तात्रय झंजे यांच्यावतीने महिलांसाठी खेळ पैठणीचा "होम मिनिस्टर" आयोजन; हजारो महिलांचा सहभाग

ब्राईट फ्युचर क्लब पुणे बरोबरच यावेळी लायन्स क्लब पुणे गोल्ड स्टारने देखील या उपक्रमात सहभाग घेतला होता. ब्राईट फ्युचर क्लबची ८७ वी सायकल राईड पुर्ण करुन, डुक्कर खिंड, महात्मा सोसायटी जवळ लावलेल्या झाडांना या राख्या बांधण्यात आल्या.

 होम मिनिस्टर मध्ये मनमुराद खेळल्या महिला; शिवणे मधील पंचदीप मंडळाचे पारदर्शक आयोजन

कोरोना काळात भावापेक्षाही प्राणवायूची गरज जास्त भासली, त्यामुळे वेळेला न मागता प्राणवायू घेऊन धावून येणाऱ्या भावासारख्या झाडांना जपले पाहिजे, वृक्ष लावले पाहिजे, ते टिकवले पाहिजे, त्यांना वाढविले पाहिजे या भावनेने वृक्षांना राख्या बांधून आम्ही वृक्षांची काळजी घेऊ असा संदेश होम मिनिस्टर फेम, ब्राईट फ्युचर क्लबचे संस्थापक बाळकृष्ण नेहरकर यांनी दिला.

 किर्लोस्कर कामिन्सच्या निवृत्तांचा एक आगळावेगळा मेळावा; देशात झालेला असा पहिलाच सोहळा

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लायन ॲड. प्रिती परांजपे यांना कवी राजेंद्र वाघ यांनी पुस्तक भेट देऊन सन्मानित केले. तसेच लायन्स क्लब पुणे गोल्ड स्टारच्या अध्यक्षा कविता मोरे, अनंता मळेकर, संजीव कोरे, अजिंक्य कोरे, राजेंद्र रेनुकदास, तसेच लायन्स क्लबचे सदस्य आणि लेखिका सोनल गोडबोले, यशवंत चौहान, हनुमंत, अशोक डोंगरे, आर्या मोरे, अशोक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

 शिवणे मधील "रंग" ने असे भरले नागरिकांच्या घरातील गौरी गणपतीच्या आनंदात रंग

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.