Type Here to Get Search Results !

धुमाळांच्या संकल्पनेतील संजीवन उद्यान हे कोथरूड आणि वारजे भागातील लाखो रहिवासी यांच्यासाठी नव संजीवनी ठरेल

 

पुणे, दि. २१ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत वारजे माळवाडी चा समावेश होण्याअगोदर या भागातील या खिंडीला एका अनोख्या वेगळ्या नावाने ओळखले जात होते परंतु संजीवन उद्यानाच्या भूमिपूजन आणि या वारजे खिंडीची ओळख बदलली जाणार असून, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ यांच्या संकल्पनेतील संजीवन उद्यान हे कोथरूड आणि वारजे भागातील लाखो रहिवासी यांच्यासाठी ऑक्सीजन पार्क होणार असून त्यानंतर अभिमानाने आपल्याला “होय वारजे बदलतयं” असे म्हणता येईल, असे मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मांडले.

 आगामी काळात पुण्यातील तृतीयपंथी समाजासाठी भरीव कामगिरी करणार; बाबा धुमाळ यांची तृतीयपंथीयांना ग्वाही

विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदिप धुमाळ यांच्या प्रयत्नाने करण्यात येत असलेल्या वनविभागाच्या 35 एकर जागेतील भव्य संजिवन उद्यान भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, नगरसेवक सचिन दोडके, दिलीप बराटे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल, उपवनसंरक्षक वनविभाग राहुल पाटील, आयुक्त विक्रम कुमार अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनर, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते वारजेतील अत्याधुनिक धुमाळ उद्यानाचे लोकार्पण
पुणे शहर विकसित होत असताना आपणाला कायमच नैसर्गिक समतोल राखण्याचा काम करावे लागणार आहे. पुणे शहर तंत्रज्ञानामध्ये विकसित होत असताना नैसर्गिक समतोल राखण्याचे काम करण्याची भूमिका राष्ट्रवादी पक्षाचे काम वतीने करण्यात येत असल्यानेच पक्षाचे अनेक नगरसेवकांनी मार्फत नैसर्गिक साधनसंपत्तीचा समतोल राखण्यासाठी उद्याने आणि तत्सम नैसर्गिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेला हा उपक्रमही यामध्ये भर टाकणार आहे. सुरुवातीच्या काळात या डोंगरावरती ज्या विदेशी वृक्षांची लागवड केली होती याचा सध्याच्या काळात कोणताही फायदा होत नसल्याने या वृक्षांच्या जागेवरती आता देशी वृक्षाची लागवड केल्यानंतर या परिसरातील हवा शुद्धीकरणासाठी याचा चांगला उपयोग होणार असून एक आदर्शवत उद्यान तयार करण्याच्या सूचना यावेळी अजित पवार यांनी दिल्या.

कोरोनावर मात करून आलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे सुप्रिया सुळे यांनी हटके अंदाज मध्ये केले कौतुक

वारजे माळवाडी परिसराचा विकास करण्यासाठी या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक काम करत असताना अनेक वेगवेगळ्या कल्पना अवलंबत असल्याने पुणे शहरात वारजे एक नवी ओळख तयार करत आहे. संजीवन उद्यानाच्या माध्यमाने वारजे माळवाडीला नवी ओळख निर्माण झाली असून याला नागरी सहभागाची गरज असल्याने स्थानिक नागरिकांनी ही सहभागी होण्याचे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.

 पुण्यात पहिल्यांदाच मियावाकी पद्धतीने वृक्षारोपणाचा प्रयोग

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.