पुणे, दि. २३ (चेकमेट टाईम्स): “संजय काकडे जागे
व्हा... घर द्या, घर द्या...” म्हणत, संजय काकडे यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर
चौक, कर्वेनगर मधील नव्याने सुरु झालेल्या प्रकल्पासमोर न्यू कोपरेगाव पुनर्वसन न
झालेल्या वंचित कुटुंबियांचे डॉ कुमार सप्तर्षी यांच्या युवक क्रांती दलाच्या
नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन सुरु आहे. गेल्या आठ आठवड्यापासून दर सोमवारी याच
ठिकाणी होत हे सत्याग्रह आंदोलन सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या
ग्रामस्थांचा हा लोकशाही मार्गाने लढा चालू आहे. मात्र या आंदोलकांना कोणीही दाद
देताना दिसत नाहीये.
17 एप्रिल 2017 रोजी युवक क्रांती दलाच्या नेतृत्वाखाली
सुरू झालेले हे सत्याग्रही आंदोलन युवक क्रांती दलाचा संवादावर विश्वास असल्याने
आणि कोविड २१ च्या काळात प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका असल्याने थांबवण्यात
आले होते. परंतु संजय काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीला जिल्हाधिकारी महोदयांनी खुलासा
मागून व कारवाई करण्याचे आदेश देऊन सुद्धा बेमालूमपणे काम बंद न करून मिटींगला
येण्या संदर्भात टाळाटाळ करत राहिल्याने युवक क्रांती दलाने २१ जून पासून काकडे
कन्स्ट्रक्शन कंपनीच्या साइटच्या दारात हे सत्याग्रही आंदोलन सुरू केले आहे. तेव्हा
पासून २३ ऑगस्ट पर्यंत दर सोमवारी होत असलेले हे सत्याग्रह आंदोलन ८ वेळा सलगपणे सुरू
आहे आणि मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच राहणार असल्याचे युक्रांद’चे संदीप
बर्वे, जांबुवंत मनोहर यांनी
चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले.
यावेळी वेगवेगळ्या संघटनांचे लोक पाठिंबा देण्यासाठी आले
होते. त्यात विजय बोडेकर आणि सागर आवटे यांचा सहभाग होता. या पुनर्वसनापासून वंचित
८८ कुटूंबांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे युक्रांदने
सांगितले आहे. यावेळी युक्रांदचे अप्पा अनारसे, सचिन पांडुळे, कमलाकर शेटे आणि
सुदर्शन चखाले उपस्थित होते. तर यल्लाप्पा धोत्रे, नंदू
शेळके, ललित मुथा, कुमार गायकवाड
यांच्यासह यावेळी सर्वच्या सर्व ८८ कुटुंबांचा आंदोलनात सहभाग होता. त्यामुळे
आगामी काळात लोकशाही मार्गाने चाललेल्या या आंदोलनाची व्याप्ती वाढेल असे चित्र
निर्माण झाले आहे.
वारजे पोलीस स्टेशनच्या १ अधिकारी आणि ७ कर्मचाऱ्यांच्या
बंदोबस्तात हे आंदोलन घोषणाबाजी करत चालू होते.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/