पुणे, दि. १३ (चेकमेट टाईम्स): गेल्या अनेक
महिन्यांनंतर पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची आज वारजे माळवाडी परिसराकडे
वक्रदृष्टी फिरली आणि जवळपास ४ हजार चौरसफूट क्षेत्रफळ असलेल्या दोन अनधिकृत बांधकामांवर
कारवाई दाखवण्यात आली.
सहा महिन्यांपेक्षा अधिक
कालावधीपूर्वी वारजे माळवाडी हायवे परिसरातील कारवाई
केल्यानंतर आज शुक्रवार दि.१३ ऑगस्ट २०२१ पुणे महानगरपालिका बांधकाम विकास
विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे, उपअभियंता देवेंद्र पात्रे यांच्या
मार्गदर्शनाखाली, कनिष्ठ
अभियंता सतीश शिंदे, सचिन जावळकर यांच्या पथकाने १
जेसीबी, १ गॅस कटर, २ ब्रेकर मशीन आणि बिगारी, बांधकाम विभागाच्या पोलीस
बंदोबस्तासह, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई
करण्यात आली.
यामध्ये
प्रामुख्याने पुणे महानगरपालिकेच्या शामराव बराटे (दिगंबरवाडी) शाळेजवळील शांती
संकुल समोर सहजासहजी डोळ्याला न दिसणाऱ्या एका ५ ते ७ फुटांच्या गल्लीत घुसून जवळपास
१ हजार २०० चौरसफूट क्षेत्रफळात बांधण्यात आलेल्या पक्क्या स्वरूपाच्या तळमजला +
एक असलेल्या बांधकामाच्या स्लॅबचा एक चौकोन आणि एक कॉलम पाडण्यात आला. विशेष
म्हणजे या बांधकामाच्या स्लॅबला जेव्हा ब्रेकर मशीन लावण्यात आले, तेव्हा क्षणातच स्लॅबला
बीळ पडून मशीन खाली आल्याने, येथील कॉंक्रीटच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होते आहे.
बाकी कॉलम आणि बीमची स्ट्रेन्थ, त्यात वापरलेले स्टील पाहता किमान ५ ते ६ मजली
मजबूत इमारतीचे प्रयोजन स्पष्ट होत होते.
तर त्यानंतर
गोकुळनगर, वाराणसी सोसायटीच्या शेवटच्या टोकाला हिल स्लोप भागात असलेल्या एका ३
हजार चौरस फुटांच्या फुटिंगमध्ये असलेल्या कामावर कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात
आला. यात फुटिंगची एक बाजू उकरून काढत कारवाई थांबवण्यात आली. विशेष म्हणजे या
बांधकामाला पुणे महानगरपालिकेकडून पुरवण्यात येणारे पिण्याचे वापरण्यात येत
असल्याची तक्रार स्थानिक रहिवाश्यांनी केली. तर बांधकामाच्या ठिकाणी पाणी
साठवण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे गणपती विसर्जन हौद वापरण्यात येत होते. त्यामुळे
या एकूणच बांधकामावर स्थानिकांनी शंका व्यक्त केली आहे. मात्र पुणे महानगरपालिकेचा
लाखोंचा महसूल बुडवण्याबरोबरच नागरी सुविधांवरील तान वाढवणाऱ्या अशा अनधिकृत
बांधकामांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेला ठोस उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक
पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/