पुणे, दि. ६
(चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेत समावेश होऊन वीस वर्षे झाली तरी वारजे रामनगर
भागातील प्राथमिक सुविधा पुरवण्यात देखील पुणे महानगरपालिकेला अपयश येत असल्याचे
दिसत असल्याने संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते पराग ढेणे यांनी वारजे कर्वेनगर
क्षेत्रीय कार्यालयात ठिय्या मारून या समस्या त्वरित आणि कायमस्वरूपी सोडवण्याची
मागणी केली आहे. त्याबाबतचे निवेदन क्षेत्रीय अधिकारी उमाकांत डिग्गीकर यांना ढेणे
यांनी दिले आहे.
यात प्रामुख्याने वारजे रामनगर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक
ते अचानक चौक या भागातील रस्त्यावरील पथदिवे, तसेच अंतर्गत भागातील दिवे देखील बंद
आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी या भागातून जाणाऱ्या नागरिकांना असुरक्षिततेची
भावना निर्माण होत आहे. त्याचबरोबर रामनगर मधील वैदुवाडी भागात मैलावाहिन्यांचे
चेंबर सतत तुंबत असतात. येथील त्या ड्रेनेज लाईनच चुकीच्या पद्धतीने बसवल्या
असल्याने चेंबर सतत तुंबत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेले होते.
त्यासाठी ती संपूर्ण ड्रेनेज लाईनच बदलून टाकावी अशीही मागणीही ढेणे यांनी यावेळी
केली आहे.
त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून गणपती माथा, न्यू अहिरेगाव, गणेशपुरी सोसायटी, कारगिल सोसायटी, रामनगर, खानवस्ती,
वारजे गावात डासांची व्युत्पत्ती मोठ्या प्रमाणात झालेली निदर्शनास
येत असून, डासांमुळे नवीन आजार उद्भवत आहेत. याचाच विचार करून दाटीवाटीच्या या
प्रभागात कुठलीही साथ पसरून मोठा धोका उद्भवू नये, याकरिता किटक नाशक फवारणी करून
घ्यावी, अशीही मागणी ढेणे यांनी केली आहे. तर अधिकाऱ्यांशी चर्चा करून किंवा
निवेदन देऊन आपण थांबणार नाही आहोत. तर आपण या सर्वच समस्यांचा पुढेही पाठपुरावा
करून त्या सोडवून घेणार आहोत. तसेच प्रभागातील इतरही समस्यांवर भविष्यात देखील काम
केले जाईल असा विश्वास ढेणे यांनी व्यक्त करत, तुम्ही हाक द्या, मी साथ देईल असे आश्वस्त केले आहे.
एकूणच वारजे
रामनगरच्या भागातील गल्लीबोळातील ड्रेनेज लाईन सदोष पद्धतीने टाकल्याच्या चर्चा
नेहमीच नागरिक करत असतात. त्याचबरोबर या भागांमध्ये होणारे गल्लीबोळ कॉंक्रीट आणि
इतर विकासाची कामे देखील सदोषच असतात. मात्र प्रशासनाकडे याबाबतच्या तक्रारी
करूनही प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे नागरिकांनी नाव न प्रसिद्ध
करण्याच्या अटीवर चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले. त्यामुळे वारजे रामनगर मध्ये
होणाऱ्या कामांची पडताळणी गांभीर्याने न केल्या गेल्यास हा भाग सुदृढ विकासापासून
वंचित राहील की काय अशी भिती नागरिक व्यक्त करत आहेत.
माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
पराग ढेणे याचां विचाराशी सहमत आहे.👍
उत्तर द्याहटवा