Type Here to Get Search Results !

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांचा मोबाईलवर बोलत शतपावली करणाऱ्याला दणका; मोबाईल नेला हिसकावून

 

पुणे, दि. ७ (चेकमेट टाईम्स): आतापर्यंत आपण दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांना टार्गेट करत त्यांच्या गळ्यातील मौल्यवान दागिने चोरून नेल्याच्या अनेक घटना ऐकल्या आहेत, अनुभवल्या आहेत. मात्र त्यानंतर महिलांनी बेन्टेक्स जवळ केल्याने आता चोरट्यांनी आपला मोर्चा रस्त्याने मोबाईलवर बोलत चाललेल्यांकडे वळवलेला दिसत असून, कोथरूड कर्वेनगर परिसरातील अलंकार पोलीस स्टेशन हद्दीत अशीच एक घटना घडली आहे. याबाबत अलंकार पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप साखरे पुढील तपास करत आहेत.

 तुमच्या घरात चोरी होण्यापूर्वी ही बातमी पहा; बायकोचा फेसबूक फ्रेंड निघाला घरात चोरी करणारा चोर

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६७ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक गुरुवार दि.५ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री नऊ – साडेनऊच्या सुमारास अलंकार पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशनगर भागात असलेल्या एक सोसायटीच्या सार्वजनिक रस्त्यावर मोबाईलवर बोलत शतपावली करत होते. यावेळी मागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या कानाजवळून फोन हिसकावून पोबारा केला. यावेळी भेदरलेल्या ज्येष्ठ नागरिकाला गाडीचा नंबर देखील टिपता आला नाही.

 लग्नात वधू वरांच्या दागिन्यांवर डल्ला मारणारी बंटी बबलीची जोडी गजाआड; ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

याबाबत अलंकार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप साखरे पुढील तपास करत आहेत. मात्र या घटनेतून पुन्हा एकदा दुचाकीवरील चोरटे बाहेर पडल्याचे दिसत असून, त्यांनी यावेळी पुन्हा एकदा ज्येष्ठांना टार्गेट केलंय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. तर नागरिकांनी रस्त्याने चालताना हातात, वरच्या खिशात मोबाईल फोन ठेवणे देखील धोक्याचे झाले आहे का असाही प्रश्न उपस्थित होत असून, नागरिकांनी आपापल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

 चोरीच्या गाड्या विकण्यासाठी त्याने लढवली अजब शक्कल; उच्चशिक्षित तरुणाची करामत

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.