खा. वंदना चव्हाण, प्रशांत जगताप यांच्याकडून पाहणी
पुणे, दि. २ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील महानगरपालिकेच्या सर्वात मोठ्या आणि
अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेल्या, लाखोंचे शैक्षणिक शुल्क उकळणाऱ्या खाजगी
शाळांना लाजवेल अशा भारतरत्न डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलचे शिक्षक दिनाच्या
पूर्वसंध्येला शनिवार दि.४ सप्टेंबर २०२१ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, देशाचे माजी कृषिमंत्री
खा. शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कोविडच्या प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होणार असून,
नागरिकांनी या कार्यक्रमाचा ऑनलाईन आस्वाद घ्यावा असे आवाहन नगरसेविका लक्ष्मी
दुधाने, स्वप्नील दुधाने यांनी केले आहे.
उद्घाटन सोहळ्याच्या
पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी
ई-लर्निंग स्कुलला सदिच्छा भेट देत पाहणी केली. या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे,
चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, पुणे महानगरपालिका आयुक्त
विक्रम कुमार यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मात्र या उद्घाटन सोहळ्यात कोविड नियमांचे
कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होणार नाही, याची काळजी आयोजकांकडून घेतली जात असून,
या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण राष्ट्रवादीचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने
यांच्या फेसबुक पेज आणि युट्युब चॅनल वरून करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी
गर्दी न करता आपण असाल तिथून सोहळ्याला ऑनलाईन उपस्थिती लावावी, असे आवाहन नगरसेविका
लक्ष्मी दुधाने, स्वप्नील दुधाने यांनी केले आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची लिंक
: https://twitter.com/checkmate_times