पुणे, दि. ३
(चेकमेट टाईम्स): डिसेंबर २०१९ ला तोंडावर आपटून जॉ कटर मशिनसह शिवणे मधील सर्व्हे
क्र.९७ मधून माघार घ्यावी लागलेल्या आणि “पुन्हा लवकरच येईन” म्हणून गेलेल्या पुणे
महानगरपालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाने तब्बल २१ महिन्यानंतर पुन्हा शिवणे मधील
सर्व्हे क्र.८५ मध्ये जॉ कटर मशिनसह दाखल होत, तब्बल २० हजार चौरस फुट क्षेत्रफळ
अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. (या कारवाईचा व्हिडीओ सर्वात खाली जोडलेला आहे.)
बांधकाम
विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे, उप-अभियंता देवेंद्र पात्रे, जयवंत
पवार, कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे, संदेश
कुळवमोडे, गंगाप्रसाद दंडीने, संग्राम
पाटील, सचिन जावळकर यांच्या पथकाने, कोथरूड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वारजे
पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक
अमृत मराठे यांच्यासह अतिक्रमण विभाग, स्थानिक पोलीस स्टेशन आणि एसआरपीएफ
मिळून तब्बल १५० पोलिसांच्या बंदोबस्तात, कोथरूड अग्निशमन दल प्रमुख गजानन पाथ्रूडकर
यांच्यासह ४ अग्निशमन जवानांसह फायर गाडी आणि १ रुग्णवाहिका अशा मोठ्या फौज-फाट्याच्या
तयारीत १ जॉ कटर मशीन, २ जेसेबी मशीन, २ गॅस कटर, १० बिगारी
वापरून ही कारवाई केली.
या शिवणे
येथील दांगट पाटील नगर मधील सर्व्हे क्र. ८५ मध्ये काही दिवसांपूर्वी देखील कारवाई
झाली होती. तर त्या अगोदर देखील दांगट पाटील नगर कमानीजवळील एका बांधकामावर कारवाई
करत बांधकाम थांबवले होते. आता पुन्हा याच भागात कारवाई होत असल्याने बांधकाम
व्यावसायिकांसह स्थानिक भूमिपुत्रांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या भागातील
गावांच्या एनडीए मध्ये जमिनी गेल्यामुळे अनेकजण भूमिहीन झाले आहेत. त्यात
तरुणांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळे तरुण मंडळी बांधकाम व्यवसायाकडे वळून
उदरनिर्वाह करू लागली. मात्र आताच्या कोविड महामारीमुळे हे सर्वजण आर्थिक संकटात
असतानाही स्वत: कर्जबाजारी होऊन काही गरीब मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न हेच
लहान लहान बांधकाम व्यावसायिक सोडवत आहेत.
मात्र अशाही
परिस्थितीत बांधकामांवर कारवाई होत असल्याने बांधकाम व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त
केली. या कारवाईला विरोध म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, राष्ट्रवादीचे
शुक्राचार्य वांजळे, अनिता इंगळे, अतुल आप्पा धावडे, अतुल दांगट, विकास दांगट,
भाजपाचे सचिन विष्णुपंत दांगट यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम व्यावसायिकांनी सकाळी
१० ते दुपारी १ वाजेपर्यंत अतिक्रमण कारवाईला विरोध म्हणून लोकशाही मार्गाने
रस्त्यावर बसत कारवाई न करण्याची विनंती केली. मात्र बांधकाम विभागाने पोलीस
पथकाच्या मदतीने सर्वांची समजूत काढून, रस्त्यावरून हटवत, एक दुमजली इमारत आणि एका
कॉलम लेवल अशा दोन अनधिकृत बांधकामावर मोठी कारवाई केली. यामध्ये वीस हजार चौरस फूट
बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
पुणे
महानगरपालिकेच्या या धडक कारवाईमुळे या भागातील छोट्या बांधकाम व्यावसायिकांचे
धाबे दणाणले असून भितीचे वातावरण तयार झाले आहे. लोकांच्या पोटापाण्याचा आणि
सामान्य नागरिकांना स्वस्तात घरे देण्याच्या नादात, कर्जबाजारी होत, स्वत:चे स्वास्थ्य
बिघडवून घेण्यापेक्षा, दुसरे कोणतेतरी लहान मोठे व्यवसाय करू अशी भूमिका या
बांधकाम व्यावसायिकांमधून व्यक्त केली जाऊ लागली आहे. तर काहींनी “सरकार कष्टाने
पैसा मिळवू देईना आणि समाज भिक मागू देईना” अशी अवस्था झाल्याचे चेकमेट टाईम्स’शी
बोलताना सांगितले. एकूणच शासनाने प्रत्येकाचा सहानुभूतीने विचार करताना पालिकेचे
उत्पन कसे घटणार नाही कायदे लक्ष्य देत असताना, तयार झालेल्या बांधकामांवर
निष्कासन कारवाई करण्यापेक्षा मुळातच अशी बांधकामे उभारली जाण्यापूर्वी रोखायला
हवी होती, असे मत व्यक्त केले जात आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची लिंक
: https://twitter.com/checkmate_times