Type Here to Get Search Results !

बाप्पाच्या दर्शनाला जाताना कर्वेनगर मध्ये अपघात, दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; वारजे माळवाडी’वर शोककळा

 

पुणे, दि. १६ (चेकमेट टाईम्स): गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घ्यायला जाणाऱ्या वारजे माळवाडी मधील दोन तरुणांचा कर्वेनगर उड्डाणपुलावर अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि.१५ सप्टेंबर २०२१ रात्री ११ च्या सुमारास घडली. याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असुन, वारजे पोलीस तपास करत आहेत.

 

अवैद्य दारू विक्री करणाऱ्या कर्वेनगर मधील हॉटेलवर वारजे पोलिसांचा छापा; हजारोंची दारू जप्त


वारजे माळवाडी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शंकर अंकुश इंगळे (वय २०) आणि सलीम इस्माईल कोकरी (वय २० दोघेही राहणार, गोकुळनगर, वाराणसी परिसर, वारजे माळवाडी, पुणे) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.

 

१०० दिवसांच्या आतच कर्वेनगर उड्डाणपुलाची कुरबुर चालू


शंकर आणि सलीम दोघेही मित्र असून, पाण्याच्या टँकरने घरोघरी पाणी टाकण्याचे काम करतात. दोघेही दर महिन्याच्या चतुर्थीला आपल्या लाडक्या दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जात. मात्र कोरोनामुळे मंदिर बंद आहे, उत्सव नाही, पण किमान सर्वात महत्वाचे गणेशोत्सवातले मुखदर्शन तरी व्हावे यासाठी ते बुधवारी रात्री दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला निघाले असताना, त्यांची केटीएम बाईक एमएच १२ पीएल ०१२७ कर्वेनगर उड्डाणपुलावरील शेवटच्या वळणावर घसरली आणि उपचारापूर्वीच त्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

 

कर्वेनगर ते आंबेडकर चौक भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वारजे विकास कृती समितीचे आंदोलन


अपघाताबाबत माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त गजानन टोंपे, वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पोलीस उपनिरीक्षक जनार्दन होळकर यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला बोलावून अपघातग्रस्ताना रुग्णालयात हलवण्याची तयारी केली होती. मात्र या रुग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही तरुणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचा निष्कर्ष काढला. यानंतर खाजगी रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही ससून रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान ससून मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.

 

कर्वेनगर मध्ये सामोसे कारखान्यात सिलेंडरचा भडका उडून ४ जण जखमी; दोघांची प्रकृती चिंताजनक


यातील शंकर इंगळे हा भाऊ सदाशिव इंगळे याच्या माध्यमातून पाण्याच्या टँकरच्या व्यवसायात आला होता. वाराणसी सोसायटी, गोकुळनगर, सहयोग नगर पठार भागात पाण्याचे टँकर पुरवण्याचे काम तो करत होता. तर कोणताही काम धंदा नसलेल्या सलीमला त्याने टँकरचा व्यवसाय शिकण्याची प्रेरणा देत, इतरही तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणारा, चांगले संस्कार करणारा तरुण म्हणून शंकरची ओळख निर्माण झाली होती.

 

कर्वेनगरमध्ये सहाआसनी रिक्षावर भल्या पहाटे झाड पडले; सुदैवाने जीवितहानी टळली


मात्र भरधाव वेगातील त्यांच्या केटीएम बाईकने अपघातात दोघाही मित्रांचा बळी घेतला. यावेळी ही बाईक घसरल्यानंतर रस्त्याच्या मधल्या दुभाजकाला चार ठिकाणी उडून धडकली. त्यातच दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत होऊन, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एवढ्या भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकी चालवत असताना त्यांनी हेल्मेट वापरले असते तर त्यांचा प्राण वाचला असता. तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्दन होळकर करत आहेत.

 

यावर्षी पुन्हा गणपती विसर्जन हौद तुंबले, गणेश भक्तांमध्ये नाराजी; महानगरपालिकेची यंत्रणा कोलमडली


वरील वृत्त आपल्या खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.