पुणे, दि. १ (चेकमेट टाईम्स): बनावट फेसबुक खाती
उघडून कंपनीची जाहिरात करण्याची नोकरी करण्यास सांगत, एका तरुणीची फसवणूक पगार न
देता, उलट १० हजार रुपये भरायला लावून फसवणूक केलेप्रकरणी वारजे पोलीस स्टेशन
मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट फेसबुक खाती उघडून देणाऱ्या लाईमलाईट ट्रेंड्सच्या संचालकास अटक करण्यात आली आहे.
लाईमलाईट ट्रेंड्स प्रा.
लि. या नावाने दांगट इस्टेट, शिवणे मध्ये ही कंपनी सुरु करण्यात आली आहे.
त्यामध्ये तरुणांना सोशल मिडीयामधून काम करत महिन्याला हजारो रुपये कमावण्याच्या
भूलथापा मारत, नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यासाठी फोन पे, रोख स्वरुपात १०
हजार रुपयांचे नोंदणी शुल्क घेत, नंतर बनावट फेसबुक खाती उघडून देत, त्यावरून कंपनीची
जाहिरात करून घेत, पगार न देता फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला होता.
भरलेले पैसे, काम
केल्याचा पगार परत मागितले असता, कंपनीमधील कर्मचाऱ्यांकडून दमदाटी झाल्यानंतर तरुणीने
वारजे पोलिसात धाव घेऊन, घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. यानंतर पटापट सूत्रे हलत संबंधित
लाईमलाईट ट्रेंड्सच्या संचालकास अटक करण्यात आली असून, त्याला ३ सप्टेंबर २०२१
पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पोलीस कोठडी दरम्यान
त्याने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली. किती रकमेचा अपहार केला. त्याने अजून
असे कुठे कुठे गुन्हे केले आहेत, याचा तपास वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड करत
आहेत.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times