पुणे, दि. १ (चेकमेट टाईम्स): सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठ ते सुस खिंड रस्त्याच्या डाव्याबाजूला पदपथ आणि सायकल ट्रॅकचे
काम चालू असून, त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडीत भर पडणार आहे.
त्यामुळे हा स्मार्ट रस्त्याचा फार्स आम्हाला नको म्हणत पाषाणकरांनी या रस्त्याला
विरोध केला आहे.
याबाबत पुणे महानगरपालिकेचे माजी
नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी या रस्त्यावर मनमानी पद्धतीने चालू असलेले काम
थांबवण्याबाबत पुणे महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठ ते सुस खिंड या रस्त्यावर सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत सुसज्ज पदपथ आणि
सायकल ट्रॅकचे काम चालू करण्यात आले आहे. मात्र हे काम करत असताना तेथील रस्त्याची
रुंदी ७ मीटर पर्यंत येते आहे. त्यामुळे शेजारी शेजारी दोन वाहनांना जातानाही समस्या
निर्माण होणार आहे.
या भागातून पुढे बावधन, सुस, पाषाण,
सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पंचवटी, एनसीएल या भागाकडे वाहने जातात येतात. या
भागातील नागरीकरण वाढले असून, नित्याने वाहतुकीत भर पडते आहे. याची परिणीती म्हणून
या रस्त्यावर भविष्यात वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच, अपघातांमध्ये लक्षणीय वाढ
होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे काम चुकीचे असून,
ते त्वरित थांबवून, आवश्यक ते बदल करावेत अशी मागणी प्रमोद निम्हण यांनी केली आहे.
यामध्ये बदल न झाल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा पवित्रा देखील प्रमोद
निम्हण यांनी घेतला आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची लिंक
: https://twitter.com/checkmate_times