पुणे, दि. ७ (चेकमेट टाईम्स): आपल्याकडे शिक्षकांना मान सन्मान देण्याची पद्धत
अलीकडील 10 वर्षात कमी झाली. आता विद्यार्थ्यांना काहीही
बोलले तरी केस होत आहेत. एकूणच आमच्या हातात दगड दिलाय आणि छनी हातोडा काढून
घेतलाय, मग कसे घडवायचे विद्यार्थ्याला? असा उद्विग्न सवाल
प्रा. डॉ. सुधाकर जाधवर यांनी विचारलाय. पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या
दिपाली धुमाळ आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ यांच्या माध्यमातून
आयोजित शिक्षक गुणगौरव समारंभात ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष
प्रशांत जगताप, नगरसेवक सचिन दोडके, सायली वांजळे, वारजे माळवाडी परिसरातील
शैक्षणिक संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. सुधाकर जाधवर यांनी म्हटले की, आपल्याकडील
शिक्षणपद्धती बदलायला हवी. नाहीतर कितीही पोलीस स्टेशन काढा काही फरक पडणार नाही, माणूस घडवणारा अभ्यासक्रम शिकवला गेला
पाहिजे, तर आणि तरच देशाच्या हिताचा समाज घडेल. त्याचवेळी “टांगेवाला हो पण
श्रीकृष्णासारखा” हे शिक्षण देणारी आई व्हा, असा सल्लाही
जाधवर यांनी शिक्षकांसह पालकांना दिलाय.
अमेरिकेच्या शिक्षण व्यवस्थेतअ अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकात
३ खेळ आहेत. परदेशाच्या शिक्षणात “हेल्थ इज वेल्थ शिकवत आहेत” आणि आपल्या
अभ्यासक्रमात फक्त खरडपट्टी चालू आहे, लिहित रहा, लिहित रहा. हे सगळे बदलायला हवे.
त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी असेही मत जाधवर यांनी व्यक्त केलंय.
तर कोरोना काळातील सर्व्हे असो की मतदार याद्यांचे काम, देशावर
कोणतीही आपत्ती आली किंवा महत्वाचे काम होणार असेल तर सर्वात अगोदर शिक्षकांची
आठवण काढली जाते. आमच्या काळात शिक्षणाला आणि शिक्षकांना महत्व देण्यात आलं. मात्र
मधल्या काळात त्याच्या उलट घडलं. मात्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शिक्षण
व्यवस्थेसाठी पुन्हा भरीव कामगिरी होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत
जगताप यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसापचे कार्यवाह वि. दा.
पिंगळे यांनी केले.
बीएड, डीएडचे
जनक आणि शिक्षकांना ट्रेनिंग देणाऱ्या उदारमतवादी अशा शिक्षिका होत्या त्या सावित्रीबाई फुले. आज सर्वत्र त्यांच्या
प्रतिमेचे पूजन होते. मात्र ज्या पुण्यातून आणि ज्या भिडे वाड्यातून त्यांनी ही
शिक्षणाची ज्योत पेटवली तो भिडे वाडा स्मारक जिवंत राहिलं पाहिजे : सुधाकर जाधवर
वरील वृत्त आपल्या खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो
करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची लिंक
: https://twitter.com/checkmate_times