Type Here to Get Search Results !

विरेश शितोळे यांच्या प्रयत्नांतून तिरुपती नगर मध्ये मतदार नावनोंदणी आणि दुरुस्ती अभियान

 

पुणे, दि. २८ (चेकमेट टाईम्स): मतदान करणे हा १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्या हक्काची जाणीव करून देणे, त्यांची नोंदणी करणे, नाव पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे, मतदानासाठी नागरिकांना प्रवृत्त करणे किंबहुना मतदारांना मतदान करावेसे वाटणे याकरिता सक्षम आणि पारदर्शक लोकप्रतिनिधीची गरज असते. मात्र मागच्या काही वर्षांपासून मतदानाची घटलेली टक्केवारी चिंतेचा विषय आहे. अशातच एखादा आशेचा किरण नागरिकांना दिसल्यास, त्याला नागरिक उत्तम प्रतिसाद देतात. याचे उत्तम उदाहरण आहेत, ते म्हणजे वारजे कर्वेनगर परिसरातील राजमुद्रा प्रतिष्ठानचे विरेश शितोळे. (Voter Registration and Correction Campaign by Viresh Shitole)

 

महिलांनीही काढला राग; वारजे कर्वेनगरच्या वाहतूक कोंडीवर महिला झाल्या संतप्त


विरेश शितोळे यांनी वारजे कर्वेनगर (Warje Karvenagar) परिसरातील लोकशाही (Democracy) बळकट करण्यासाठी, मतदार नागरिकांना अपेक्षित असलेला पारदर्शक कारभार चालवण्यासाठी मतदार नोंदणी आणि दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे. त्याला वारजे कर्वेनगर परिसरातील तिरुपती नगर सोसायटी (Tirupati Nagar Soc) मधून सुरुवात केली असून, शितोळे यांच्या कामाची पद्धत पाहता नागरिकांनी या नोंदणी आणि दुरुस्ती मोहिमेला प्रचंड प्रतिसाद दिलाय. सोसायटीतील सभासदांनी या अभियानात सहभागी होऊन आपली व आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे नोंद,न व तपासून घेतली. शिवाय अनेक नवीन मतदारांची नोंदणी आणि नाव पत्त्यांमध्ये दुरुस्ती देखील झाली आहे.


होय बिगर पैशात होऊ शकते नदी जलपर्णी मुक्त; पुणे महानगरपालिकेच्या सहकार्यातून आम्ही करून दाखवले

 

अशाचप्रकारे सध्याच्या प्रभाग ३१ मधील (Warje Karvenagar Prabhag 31) आवश्यक त्या ठिकाणी मतदार नोंदणी आणि दुरुस्ती अभियान राबवण्यात येणार असल्याचे शितोळे यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले असून, नागरिकांना अपेक्षित असलेले प्रत्येक कार्य करण्यासाठी आपण अग्रभागी असू असा शब्द शितोळे यांनी तिरुपती नगर मधील सभासदांसह प्रभागातील नागरिकांना दिला आहे.


वारजे मधील काकडे सिटीच्या तळ्यात पडून बुडाल्याने एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू

 

वरील वृत्त आपल्या खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.