Type Here to Get Search Results !

लक्ष्मी आणि स्वप्नील दुधाने यांच्या प्रयत्नातून प्रभागातील ई वेस्टचे संकलन

 

पुणे, दि. २५ (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे अर्बन सेलच्या माध्यमातून नगरसेविका लक्ष्मी दुधाने आणि राष्ट्रवादीचे पुणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील देवराम दुधाने यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र. ३१ कर्वेनगर-वारजेमध्ये ई-वेस्ट कचरा संकलन उपक्रम घेण्यात आला.

 

पालिकेच्या कागदावरील पारंपारिक मळकट नावाला लक्ष्मी दुधाने यांनी केले रिफ्रेश; आता याचेही कार्यालय


कर्वेनगर, शाहू कॉलनी गल्ली क्र. १, श्रीराम सोसायटी वारजे, वारजे तपोधाम, दुधाने नगर अशा चार ठिकाणी राबविण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांना भरघोस प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांनी घरात वापरात नसणारी व बंद अवस्थेतील इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे पर्यावरणाच्या रक्षणासाठी दुधाने यांनी उभारलेल्या चारही केंद्रांवर जमा करत, एक सामाजिक योगदान दिले.

 

महानगरपालिकांच्या शाळांमध्ये नागरी सहभाग महत्वाचा ठरेल: वंदना चव्हाण


ई वेस्ट कचरा म्हणजे काय?

आपल्या घरातील बंद पडलेली वापर नसलेली इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक साधने ही साधने. जसे की टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, पंखा, टोस्टर, संगणकाचा सीपीयू, मॉनिटर, प्रिंटर, यूपीएस, की बोर्ड, माऊस, मोबाईल, फोन चार्जर, बॅटरीवर चालणारी खेळणी, डिजिटल कॅमेरे, पेन ड्राईव्ह, त्याच बरोबर मेडिकल साठी रुग्णालयीन कामकाजासाठी वापरली जाणारी वाफेचे यंत्र आणि तत्सम उपकरणे, ज्या मध्ये सेल अथवा विजेचा वापर होतो आणि ती बंद पडलेत खराब झालेत अशा वस्तू म्हणजे ई वेस्ट अर्थात ई कचरा.

 

दानशूर: १२ कोटी रुपयांची मोक्याची जागा लोकहितासाठी पालिकेला सुपूर्द; लोकप्रतिनिधीत्वाचे उत्तम उदाहरण


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

आमच्या डेली हंट’ची लिंक : https://profile.dailyhunt.in/ctnnpune


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.