Type Here to Get Search Results !

दिव्यांगांनी अंकाई-टंकाई किल्ला केला सर; शिवुर्जा प्रतिष्ठानची 38 वी मोहीम

 

मनमाड, दि. १३ (चेकमेट टाईम्स): राज्यातील विविध ७ जिल्ह्यांमधून आलेल्या 20 दिव्यांगांनी मनमाड जवळील अंकाई टंकाई किल्ला (ANKAI TANKAI FORT NEAR MANMAD) सर करत, पावसाळी दुर्ग अभ्यास व भटकंती मोहीम (FORT STUDY TOUR) यशस्वी पूर्ण केली. शिवुर्जा प्रतिष्ठान (SHIVURJA PRATISHTHAN) या दिव्यांगांच्या गड किल्ले संवर्धन व भ्रमण संस्थेतर्फे अंकाई-टंकाई मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध दुर्गम व जंगली गड-किल्ल्यावर भटकंती मोहिमेचे आयोजन शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे हे करत असतात.

 

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा गौरी गणपती निमित्त गड किल्ले वाचवाचा देखावा


मनमाड पासून १० किलोमीटर अंतरावर मनमाड - नगर रोडवर (MANMAD AHEMAD NAGAR ROAD) असलेला अंकाई टंकाई किल्ला, येवला तालुक्यात असून सातमाळा रांगेच्या अजिंठा डोंगर रांगेत येतो. समुद्रसपाटीपासून 3 हजार 152 फूट उंचीचा किल्ल्याच्या डोंगराच्या पोटात 10 जैन लेण्यांचा समूह असून, डोंगराला नैसर्गिक ताशीव कातळ कडे आहेत. रामायण काळात अगस्ती ऋषींनी या किल्ल्यावर वास्तव्य केल्याची नोंद आढळते.

 

सिंहगडाच्या तटबंदीवरून धावताना तरुण दरीत कोसळला


नुकतीच 9 ऑक्टोबरच्या रात्री महाराष्ट्राच्या ७ जिल्ह्यांमधून आलेल्या दिव्यांगांनी सायंकाळी साडे सहा वाजता प्रत्यक्ष अंधारात चढायला सुरुवात केली. मोबाईल बॅटरीच्या उजेडात व एकमेकांच्या हाताला हात देऊन आधार देत कातळात खोदलेल्या कोरीव पायऱ्या, खाच-खळगे, डोंगर कपारी पार करत दोन तासात अंकाई किल्ल्यावर यशस्वी चढाई केली. किल्ल्यावरील अगस्ती ऋषीच्या समाधी मंदिर परिसरात दुर्ग भोजन करून रात्रीचा मुक्काम सीता गुहेत केला.

 

सिंहगडाच्या पश्चिम कड्यावर स्वराज्यातील ३५० मावळ्यांची चढाई; तान्हाजी मालुसरेंना अनोखी मानवंदना


अंकाई टंकाई किल्ल्याची निर्मिती आठव्या शतकात झाली असून देवगिरी किल्ल्या पेक्षाही जुना किल्ला म्हणून परिचित आहे. दुर्ग प्रेमी कचरू चांभारे यांनी किल्ल्याची ऐतिहासिक, भौगोलिक व धार्मिक पार्श्वभूमी सांगितली. सहभागी सर्व दिव्यांगांना प्रतिष्ठानच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिवुर्जा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या 38 व्या मोहिमेत बीड’च्या रमेश गाडे, वैजनाथ देवळकर, पुण्यातील कैलास दुरगुडे, सतिश आळकुटे, सोलापूर’च्या विवेक गुंड, सोमनाथ धुळे, अतुल पाटील, नाशिक’च्या अंजली प्रधान, विकास प्रधान, लातूर’च्या अनंत धुळशेट्टे, सचिन गुडे, सांगली’च्या काजल कांबळे, शबाना पखाली, शिवाजी गाडे (पैठण), केशव भांगरे (अकोले), मच्छिंद्र थोरात (शिरूर), जीवन टोपे (खेड), आदित्य निकुंभ (कोपरगाव) या 7 जिल्ह्यातील 20 दिव्यांगांनी सहभाग घेतला होता.

 

पुण्यातील दिव्यांगाचा विश्व विक्रम; १५ तासांत चालवली १ हजार ८५ किलोमीटर अंतर मोटार 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

आमच्या डेली हंट’ची लिंक : https://profile.dailyhunt.in/ctnnpune


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.