Type Here to Get Search Results !

... आणि त्यांनी म्हटलं आय लव्ह वारजे

 

पुणे, दि. १३ (चेकमेट टाईम्स): “मोबाईल” आजकाल प्रत्येकाला जशी प्राणवायूची गरज आहे, तेवढीच गरज ही “स्मार्ट फोन” अर्थात मोबाईलची लागू लागली आहे. शिक्षण असो की करिअर प्रत्येक ठिकाणी आता मोबाईल लागू लागलाय. त्यामुळे मोबाईल हरवला की एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. काहीजण मोबाईल हरवल्याची तक्रार करायला पोलिसात जातात. पण त्यातील किती जणांना असे मोबाईल परत मिळालेत हे माहित असल्याने मोबाईल परत मिळेल अशी अजिबात अपेक्षाही नसते. पण जर तोच मोबाईल एखाद्याने इमाने इतबारे परत दिला तर तो आनंद खूप मोठा असतो. अशीच एक घटना वारजे मधील “आय लव्ह वारजे” सेल्फी पॉइंट जवळ घडली आहे.

 

वारजेत स्मशानभूमीला मरण कळा; कोट्यावधींची विकासकामे झाल्याचे बडवले जातात ढोल


वारजे हायवेलगत सर्व्हिस रोडलगत असलेल्या हिरवळीवर चालण्याचा व्यायाम करून “आय लव्ह वारजे” सेल्फी पॉइंट जवळ नेहमीप्रमाणे विश्रांतीसाठी बसलेल्या अनिता भरत भेगडे यांना एक महागड्या किमतीचा मोबाईल सापडला. यावेळी त्यांनी त्या मोबाईलचा मोह न दाखवता, जवळपासच्या लोकांना हा मोबाईल आपला आहे का याबाबत विचारणा केली. आजूबाजूच्या दुकानांमध्ये देखील “कोणी मोबाईल सापडला का?” असे विचारण्यास आले होते का? याबाबतही चौकशी केली. मात्र मोबाईलचा मालक मिळेना.

 

फोन पे वापरणाऱ्या व्यापाऱ्याला बँकेने लावले २३ हजार रुपयांचे सेवा शुल्क; पुण्यातील घटनेने खळबळ


शेवटी अनिता यांनी याबाबत पती भरत यांना माहिती देऊन, ज्याचा मोबाईल आहे त्याला मिळावा म्हणून सांगितले. यावेळी भरत भेगडे यांनी सामाजिक बांधिलकी असलेले या भागातील व्यक्तिमत्व कवी राजेंद्र वाघ यांना याबाबतची माहिती दिली आणि वाघ यांनी देखील क्षणाचाही विलंब न लावता, मोबाईल हरवलेला व्यक्ती पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलेला असू शकतो, हे ओळखून पोलिसांना याबाबत कळवले.

 

गर्दीत मोबाईलवर हात साफ करणारा सराईत मोबाईल चोरटा गजाआड; ३८ मोबाईलसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त


दरम्यान सापडलेल्या मोबाईलवर एक कॉल आला आणि माझा मोबाईल हरवला आहे, असे उद्गार पलीकडून बोलणाऱ्याने काढले. यावेळी प्रसंगावधान राखत राजेंद्र वाघ यांनी पलीकडील व्यक्तीची ओळख पटवून, त्याला रुणवाल सोसायटीच्या कोपऱ्यावर बोलावत त्याचा फोन त्याला परत केला. यावेळी भरत आणि अनिता भेगडे यांच्यासह राजेंद्र वाघ यांचेही त्या महागडा मोबाईल परत मिळालेल्या तरुणाने आभार मानले आणि नकळत त्याच्या तोंडून शब्द आले “आय लव्ह वारजे” !

 

तुमच्या मोबाईलचे नेटवर्क घालवून बँक खाते करतात खाली


यावेळी वाघ यांनी आपल्या मौल्यवान वस्तू जपायला हव्यात. त्याचबरोबर अशा पद्धतीने कोणाचीही अगदी एक रुपयाची वस्तू जरी आपल्याला सापडली तर त्याच्या मूळ मालकाला ती परत केली पाहिजे अशी भावना व्यक्त केली. कारण आपल्यासाठी ती एक रुपयाची वस्तू असू शकते. मात्र गरजवंताला त्याचे खरे मोल कळते, हे लक्षात घ्यायला हवे असे आवाहनही वाघ यांनी केले.

 

कपडे बदलताना महिलेचा बनवला व्हिडिओ; पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल मध्ये घडलेली घटना


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

आमच्या डेली हंट’ची लिंक : https://profile.dailyhunt.in/ctnnpune


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.