Type Here to Get Search Results !

पाडवा संध्या कार्यक्रमाला पुणेकरांनी उपस्थित राहण्यासाठी महेश काळे यांचे थेट अमेरिकेतून आवाहन

 

पुणे, दि. ३ (चेकमेट टाईम्स): कोरोना महामारीमुळे अनेक रसिक श्रोत्यांना चित्रपट आणि नाट्यगृहांमध्ये जाऊन कोणतेही कार्यक्रम पाहता आले नाहीत. तर आता काही प्रमाणात कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रपट आणि नाट्यगृहे बहरू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर वारजे माळवाडी मधील उच्चशिक्षित सामाजिक कार्यकर्ते भारतभूषण बराटे यांनी घरात कोंडल्या गेलेल्या ज्येष्ठांसह कलारसिकांची समस्या लक्षात घेता, त्यांची दिवाळी आणि येणारे वर्ष आनंदी जाण्यासाठी थेट महेश काळे यांच्या मैफिलीचे आयोजन केले आहे.

 

वारजेकरांवर लाखोंच्या बक्षिसांची बरसात; भारतभुषण बराटे आयोजित निबंध स्पर्धांचे पारितोषिक वितरण


शुक्रवार दि.५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता, वारजे माळवाडी मधील आरएमडी सिंहगड कॉलेजच्या मैदानावर रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद निशुल्क घेता येणार आहे. विशेष म्हणजे महेश काळे यांनी काही वेळापूर्वी अमेरिकेतून भारतात, अर्थात पुण्यात येण्यासाठी प्रस्थान केलेले असून, त्यांनी पुणेकरांना या कार्यक्रमाला येण्यासाठी आवाहन केले आहे. त्याबाबतचा व्हिडीओ खाली जोडलेला आहे.

 

वारजेकरांची दिवाळी झाली गोड, मिळाली लाखोंची बक्षिसे; भारतभूषणचा भूषणावह सोहळा


या कार्यक्रमाबाबत सांगताना भारतभूषण बराटे यांनी म्हटले आहे की, आपल्या भागातील नागरिकांसह सर्वच नागरिक कोविडच्या महामारीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून घरात अडकून पडले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना तर मोकळ्या हवेत फिरणे देखील मुश्कील झाले होते. त्याचवेळी कलेची उपासना करणाऱ्या कलाकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील या कोरोना महामारीचा मोठा त्रास सहन करावा लागला. एकूणच मानवीमुल्यांमधील या दोन महत्वाच्या घटकांना उभारी देण्याबरोबरच प्रभागात नवचैतन्य फुलवण्यासाठी या कार्यक्रमाचा विचार केल्याचे भारतभूषण बराटे यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले.

 

भारतभूषण बराटे यांच्या प्रयत्नातून मारुतीराय कोविड केअर सेंटरचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते लोकार्पण


तर दिवाळी पाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात करतो आणि तीच सुरुवात आनंदी झाल्यास, येणारे वर्ष आनंदी जातो अशी धारणा आहे. या धारणेचे महत्व ओळखून आपण इच्छा असूनही पूर्ण देशाला, राज्याला, शहराला एकाचवेळी आनंदी करू शकत नाही. मात्र आपल्या परिसराला आनंदी करण्याचा छोटासा प्रयत्न करू शकतो, ही या पाडवा संध्या मैफिलीचे आयोजन करण्याची संकल्पना असून, वारजेकरांनी या विनामुल्य असलेल्या मैफिलीचा सहकुटुंब आनंद घ्यावा असे आवाहन भारतभूषण बराटे यांनी केले आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

आमच्या डेली हंट’ची लिंक : https://profile.dailyhunt.in/ctnnpune


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.